व्हिडीओत पाहू शकता एका प्लॅस्टिकच्या डब्यात एक खतरनाक साप आहे. त्याच्याजवळच एक मांजर बसलं आहे. सापाकडे ते टकामका पाहत आहे. इतक्यात साप त्याच्यावर हल्ला करतो. तेव्हा मांजर इतकं घाबरतं की ते सापापासून आपला बचाव करण्यासाठी उडी मारतं. मांजर इतकी मोठी उडी मारतं की हवेतच उडतं. त्यानंतर ते सापापासून दूर जाऊन उभं राहतं. मांजरीचं नशीब म्हणा किंवा हुशारी. थोडक्यासाठी ती सापापासून बचावली आहे. सापाने अगदी तिच्या तोंडावरच हल्ला केला होता. हे वाचा - VIDEO:कोरोना सेंटरमध्ये सहा फूट लांब साप घुसला; डॉक्टर आणि रुग्णांची उडाली धावपळ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आक्रमण आणि बचाव असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. व्हिडीओ जितका मजेशीर आहे, तितक्याच मजेशीर कमेंटही त्यावर येत आहे. सापाच्या हल्ल्यापेक्षा मांजराच्या बचाव करण्याच्या पद्धतीचं जास्त कौतुक होतं आहे.Attack and Jump
आक्रमण और बचाव pic.twitter.com/2FkpHeSh9l — Rupin Sharma IPS (@rupin1992) June 2, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Snake, Viral, Viral videos