मुंबई, 28 ऑक्टोबर : बाईक (Bike) चालवायला बहुतेक तरुणांना आवडतं आणि एकदा का बाईक (Bike accident) हातात आली की मग त्यावर स्टंट (Bike stunt) करण्याचा मोहही अनेकांना आवरत नाही. किती तरी तरुण बाईकवर खतरनाक स्टंट (Bike stunt video) करताना दिसतात. अशाच एका बाईक स्टंटचा (Bike accident video) धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) झाला आहे. स्टंट करणाऱ्या बाईकस्वारचा भयंकर अपघात झाला आहे.
एक तरुण रस्त्यावर सुसाट बाईक पळवत होता. या भरधाव बाईकवर तो स्टंटही करत होता. बऱ्याच गाड्या असणाऱ्या रस्त्यावर तो वेडीवाकडी कशीही बाईक चालवत होता. पण त्याची ही हिरोगिरी त्याला चांगलीच महागात पडली. एका टँकरला त्याची बाईक धडकली आणि त्यानंतर मोठा स्फोट होऊन तरुण हवेत उडाला. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल.
#BeSafe💐 ऐसा मत करना😢😢😢😢
Hero की Heropanti nikal gayi 😢😢😢@ipskabra @arunbothra @ipsvijrk pic.twitter.com/fHZ2mo7Rgb — Rupin Sharma IPS (@rupin1992) October 27, 2021
व्हिडीओत पाहू शकता बाईकस्वार सुरुवातीला एका चाकावर बाईक पळवताना दिसतो. बाईकच्या मागच्या चाकावर तो स्पीडने बाईक चालवतो. किती तरी अंतरापर्यंत तो असाच जातो. पुढे जाऊन तर तो अगदी आपला मार्ग बदलतो.
हे वाचा - Shocking video - आधी पोट नंतर डोक्यावरून गेली गाडी; तरी तरुणाला काहीच झालं नाही
आधी रस्त्याच्या मधोमध त्यानंतर विरुद्ध मार्गावर गाडी चालवतो. ऑनलाइन रेसिंग गेममध्ये जशी गाडी चालवली जाते तशी हा तरुण प्रत्यक्षात चालवताना दिसतो. सुरुवातीला तो काही गाड्यांपासून वाचतो. पण पुढे जाऊन एका टँकरला धडकतो. त्यानंतर जोरदार ब्लास्ट होतो आणि मोठा अपघात होतो. तरुण बाईकसह हवेत उडतो. तो वेगाने रस्त्याच्या दुसऱ्या दिशेला फेकला जातो. त्याच्या डोक्यावरील हेल्मेटही उडाल्याचं दिसतं. तरुण आणि त्याची बाईक इतकी पुढे उडाली की ती दिसतही नाही आहे.
हे वाचा - HIGHWAY वर शहामृगानं लावली रेस, गंमत पाहून आवरेना हसू; पाहा VIDEO
आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. असं करू नका. हिरोची हिरोपंती बाहेर पजली, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Bike accident, Shocking accident, Shocking viral video, Stunt video, Viral, Viral videos