मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! सायकलवरून तरुणानं हवेत मारली फ्लिप, VIDEO पाहून भरेल धडकी

बापरे! सायकलवरून तरुणानं हवेत मारली फ्लिप, VIDEO पाहून भरेल धडकी

हा खतरनाक स्टंट पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

हा खतरनाक स्टंट पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

हा खतरनाक स्टंट पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 08 जुलै : सोशल मीडियावर अनेक स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून हे खरे आहेत की नाही, असा प्रश्न पडतो. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगा आपल्या सायकलीवरून हवेत फ्लिप मारून चक्क इमारतीवर सायकल चालवताना दिसत आहे. या व्हिडीओ पाहून लोकांनी याची तुलना GTA V या व्हिडीओ गेमशी केली आहे. हा व्हायरल व्हिडीओ CCTV IDIOTS या ट्विटर युझरनं शेअर केला आहे. सात सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा रस्त्यावरून सायकल चालवत येतो, अचानक एका पुलावरून खाली फ्लिप मारतो आणि जवळच्या इमारतीच्या भिंतीवरून सायकल चालवत रस्त्यावर उतरतो. अगदी एखाद्या सुपरहिरो प्रमाणे हा मुलगा स्टंट करताना दिसत आहे. वाचा-छतावरून स्विमिंगपूलमध्ये महिलेनं मारली उडी, निशाणा चुकला आणि...VIDEO VIRAL हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, आतापर्यंत एक लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. वाचा-चिमुरड्याच्या अंगावरून गेली कार आणि...श्वास रोखून धरायला लावणार VIDEO वाचा-भयंकर! सराव सुरू असतानाच फुटबॉलपटूवर कोसळली वीज, थरकाप उडवणारा VIDEO VIRAL टीप : हा स्टंट एक्सपर्टच्या मदतीनं करण्यात आला आहे. त्यामुळं घरी करण्याचा प्रयत्न करू नये.
First published:

Tags: Viral videos

पुढील बातम्या