इंदूर 06 जानेवारी : देशभरात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अकस्मात मृत्यूची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशीच आणखी एक घटना आता समोर आली आहे. यात इंदूरमधील एका जिममध्ये व्यायाम करत असताना एका हॉटेल व्यावसायिकाला हृदयविकाराचा झटका आला आणि काही सेकंदातच त्याचा मृत्यू झाला. इंदूरमधील एका जिममध्ये एक हॉटेल व्यावसायिक वर्कआऊट करण्यासाठी गेला होता आणि अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं. यानंतर काही सेकंदात तो व्यक्ती खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला, या घटनेची सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. गाडीवर बसून व्यक्तीनं कचाकचा चावून खाल्ला जिवंत साप; पुढं जे झालं ते थरकाप उडवणारं, Shocking Video गोल्ड जिमचे ट्रेनर नितीन चपरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल व्यावसायिक प्रकाश रघुवंशी हे नेहमीप्रमाणे गुरुवारी इंदूरच्या लासुदिया भागात असलेल्या गोल्डन जिममध्ये व्यायाम करण्यासाठी आले होते. यादरम्यान ते अचानक जमिनीवर बेशुद्ध पडले. यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांना जवळच्या भंडारी रुग्णालयात नेलं, तिथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी हॉटेल व्यावसायिकाला मृत घोषित केलं.
इंदूरमधील एका जिममध्ये व्यायाम करत असताना एका हॉटेल व्यावसायिकाला हृदयविकाराचा झटका आला आणि काही सेकंदातच त्याचा मृत्यू झाला. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे pic.twitter.com/JSAU6ewPPR
— News18Lokmat (@News18lokmat) January 6, 2023
दुसरीकडे भंडारी रुग्णालयाचे डॉ. हरीश सोनी यांनी सांगितलं की, रुग्णाला मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आलं होतं. तपासणीनंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांना मृत घोषित केलं. त्याचवेळी डॉ. हरीश सोनी यांनी असंही सांगितलं की, तुम्ही जेव्हाही जिममध्ये जाल तेव्हा प्रथम तुमची वैद्यकीय तपासणी करून घ्या, की तुम्ही जिममध्ये व्यायाम करण्यास योग्य आहे की नाही. यासोबतच नियमित तपासणीदेखील वेळोवेळी केली पाहिजे. त्यानंतर तुम्ही फिट असाल तरच जिममध्ये जा. मृत्यूच्या जवळ जात पोलीस कर्मचाऱ्याचं असं काम, Video पाहून थांबला नेटकऱ्यांचा श्वास गेल्या 2-3 वर्षांत लोकांचा अचानक नृत्य करताना, रस्त्यावर चालताना किंवा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यापूर्वीही असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. कोरोनाच्या कालावधीनंतर अनेकांनी त्यांच्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी जिममध्ये जाणं सुरू केलं आहे. अनेक लोक त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करत आहेत, हे कुठेतरी अशा घटनांचं प्रमुख कारण ठरत आहे.