मुंबई 04 जानेवारी : मानवताचं खरं उदाहरण देणारे आपण अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर यासंबंधीत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने स्वत:चा जीव धोक्यात टाकून एका पक्षाला वाचवलं आहे. हा व्हिडीओ बेंगळूरुमधील आहे आणि येथील बेंगळुरू ट्रॅफिक पोलिस अधिकाऱ्याने एका पक्षाला वाचवण्यासाठी धक्कादायक निर्णय घेतला आणि अनेक फूट उंच होर्डिंग बोर्डवर चढून त्यापक्षाला वाचवलं. हे ही पाहा : ना Hight पाहिली ना weight पाणघोड्यावर चढली थेट, पुढे सिंहिणंचं काय झालं तुम्हीच पाहा Video व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका उंच होर्डिंगवर एक छोटा पक्षी अडकला आहे, त्याचा जीव वाचवण्यासाठी ट्रॅफिक पोलिसने आपले प्राण पणाला लावले. कोणत्याही सुरक्षा रक्षकाशिवाय तो नारळाच्या झाडापेक्षा उंच होल्डिंग बोर्डवर चढला. जेथे त्याने एका हाताच्या सह्याने स्वत:चा बॅलेंस संभाळात पक्षाला सोडवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. लोक या पोलिस अधिकाऱ्याचं कौतुक करत आहेत. बंगळुरूचे वाहतूक पोलिस उपायुक्त कुलदीप कुमार आर जैन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. बंगळुरू ट्रॅफिक पोलिस एका पक्ष्याला वाचवण्यासाठी होर्डिंगवर चढल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांनी लिहिले, “पोलिस कर्मचाऱ्याची छुपी आणि अस्पर्शित बाजू. शाब्बास मिस्टर सुरेश.”
The hidden and unexplored side of a policemen. Well done Mr Suresh from @rajajinagartrps pic.twitter.com/D9XwJ60Npz
— DCP TRAFFIC WEST (@DCPTrWestBCP) December 30, 2022
होर्डिंगवर चढल्यानंतर वाहतूक पोलिस हवालदाराने पक्ष्याच्या पायात अडकलेला धागा काढला आणि पक्षाला त्यापासून मोकळं करत पुन्हा हवेत आपलं स्वच्छंद आयुष्य जगण्यासाठी सोडून दिलं.
अनेक फूट उंच लोखंडी होर्डिंगवर चढण्याचे धाडस करून त्यांनी पक्ष्याला मुक्त केलं. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर उपस्थित हजारो यूजर्स कौतुक करताना थकत नाहीत.