Home /News /viral /

आताच्या आता विमान लॅण्ड करा, मला फोनवर बोलायचंय; प्रवाशाची फ्लाईटमध्येच स्टाफला मारहाण

आताच्या आता विमान लॅण्ड करा, मला फोनवर बोलायचंय; प्रवाशाची फ्लाईटमध्येच स्टाफला मारहाण

विमान लँड होण्याआधीच आरोपीनं आतमध्ये गोंधळ घातला. जेव्हा फ्लाईट अटेन्डेंटनं त्याला समजवाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं अटेन्डेंटलाच मारहाण करण्यास सुरुवात केली

    वॉशिंग्टन 25 सप्टेंबर : अमेरिकेतील (America) एका व्यक्तीला फ्लाईट अटेन्डेंटला (Flight Attendant) मारहाण केल्याप्रकरणी आणि कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. विमान लँड होण्याआधीच आरोपीनं आतमध्ये गोंधळ घातला. जेव्हा फ्लाईट अटेन्डेंटनं त्याला समजवाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं अटेन्डेंटलाच मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, नंतर एअऱलाइन स्टाफनं त्याला शांत केलं. 'धावपळीच्या जीवनात मनाला..'; मुंबईतील कर्मचाऱ्याचं ते काम पाहून भावुक झाले टाटा डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, फेडरल ब्यूरो ऑफ इनव्हेस्टीगेशन (FBI) आरोपीची चौकशी करत आहे. ही घटना बुधवारी बोस्टनहून सॅन जुआन, प्यूर्टो रिको येथे जाणाऱ्या जेट ब्ल्यू फ्लाईटमध्ये (Flight) घडली. विमान रनवेवर उतरण्याआधीच आरोपी प्रवासी Khalil El Dahr याला फोन आला. मात्र, विमानात नेटवर्क (Mobile Network) नसल्यानं त्याचं बोलणं होऊ शकलं नाही. यामुळे तो प्रचंड चिडला आणि जोरजोरात ओरडू लागला. प्रवाशाचं हे वागणं पाहून फ्लाईट अटेन्डेंटनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानं सेवा चांगली नसल्याचं सांगत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पाहता पाहता तो मारहाणही करू लागला. आरोपीनं कॉलर पकडून फ्लाईट अटेंन्डेंटला (Flight Attendant) मारहाण करण्यास सुरुवात केली. जेव्हा इतर कर्मचाऱ्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो त्यांच्यासोबतही मारहाण करू लागला. त्यानं कॉकपिटमध्ये शिरण्याचाही प्रयत्न केला. लग्नाला यायचंय? मग 3 लाख रुपये द्या, नवरीनं पाहुण्यांसमोर अट ठेवत दिली अजब धमकी फ्लाईट अटेन्डेंटनं एफबीआयला सांगितलं, की Khalil El Dahr याचं फोनवर बोलणं होऊ न शकल्यानं तो नाराज होता. तो अरब आणि स्पॅनिश भाषेत ओरडत होता. त्यानं अनेक कर्मचाऱ्यांना मारहाण केली. आरोपीला नियंत्रणात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. कमीत कमी 7 क्रू मेंबर्सनी त्याला पकडलं आणि सीटला बांधून ठेवलं. फ्लाईट लँड होताच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Airplane, Viral news

    पुढील बातम्या