मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'मुलांपेक्षाही ती कुत्र्यावरच जास्त प्रेम करते'; पतीनं अजब समस्या सांगत मागितला सल्ला

'मुलांपेक्षाही ती कुत्र्यावरच जास्त प्रेम करते'; पतीनं अजब समस्या सांगत मागितला सल्ला

Reddit वर आपली कहाणी शेअर करत या व्यक्तीनं सांगितलं, की त्याची पत्नी घरात राहूनही आपल्या मुलांपेक्षा जास्त काळजी कुत्र्याची घेते.

Reddit वर आपली कहाणी शेअर करत या व्यक्तीनं सांगितलं, की त्याची पत्नी घरात राहूनही आपल्या मुलांपेक्षा जास्त काळजी कुत्र्याची घेते.

Reddit वर आपली कहाणी शेअर करत या व्यक्तीनं सांगितलं, की त्याची पत्नी घरात राहूनही आपल्या मुलांपेक्षा जास्त काळजी कुत्र्याची घेते.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 09 नोव्हेंबर : कुत्रा पाळणारे लोक (Pet Owner) या श्वानालाही आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग मानतात. ते आपल्या पाळीव प्राण्याला प्रत्येक सुख सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तरीही आजपर्यंत तुम्ही अशी महिला कधीच पाहिली नसेल की जी आपल्या मुलांपेक्षा जास्त जीव कुत्र्याला लावते (Wife Loves Dog More Than Kids) . नुकतंच एका व्यक्तीनं ऑनलाईन शेअरिंग प्लॅटफॉर्मवर सांगितलं की त्याच्या पत्नीचा आपल्या मुलांपेक्षाही कुत्र्यावर अधिक जीव आहे.

मुंगसासोबतच्या तुंबळ लढाईत गंभीर जखमी झाला कोब्रा; आता जबड्याची होणार सर्जरी

Reddit वर आपली कहाणी शेअर करत या व्यक्तीनं सांगितलं, की त्याची पत्नी घरात राहूनही आपल्या मुलांपेक्षा जास्त काळजी कुत्र्याची घेते. सुरुवातीला पतीला या गोष्टीचं काहीच वाटलं नाही कारण ती आपल्या मुलांवरही तितकंच प्रेम करायची. मात्र, आता तिचा बदललेला स्वभाव पतीही चिंतेत आहे. त्यानं लोकांकडून सल्ले मागितले आहेत.

या व्यक्तीनं आपली स्थिती सांगत म्हटलं की त्याच्या आधीच्या रिलेशनशिपमधूनच त्याला मुलं झाली होती. मात्र, आपल्या पत्नीसोबत रिलेशनमध्ये येण्याआधीच त्यानं हे स्पष्ट केलं होतं, की त्याला अजून मुलं नको आहेत. आता त्यांच्या नात्याला चार वर्ष झाली आहेत. त्याची पत्नी मुलांसोबत वाईट किंवा चुकीचं वागत नाही. मुलांनाही तिच्याबाबत तक्रार नाही. मात्र, तरीही पत्नी मुलांवर जास्त लक्ष देत नसून कुत्र्यावरच जास्त लक्ष देत असल्याचं पत्नीचं म्हणणं आहे. स्वतः पत्नीनंच पतीसमोर ही बाब मान्य केली, की ती आपल्या मुलांपेक्षा कुत्र्यावर जास्त प्रेम करते.

अनोखं गाव! इथे प्रत्येक व्यक्ती आहे शाकाहारी; मांस सोडाच, दुधाचंही नाही करत सेवन

या व्यक्तीनं या प्रकरणावर लोकांचा सल्ला मागितला असता त्याला वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या. काही लोकांनी पत्नी चुकीची नसल्याचं म्हटलं तर काहींनी पतीचा स्टॅन्ड बरोबर असल्याचं म्हटलं. एका यूजरनं म्हटलं की ही मुलं तिची नाहीत, अशात पतीनंही तिच्या भावना समजून घ्यायला हव्या. आणखी एकानं लिहिलं, की तिनं तुझ्या मुलांना सांभाळण्यास होकार दिला असताना तू तिला मुलांना जन्म देण्यापासून रोखतो, हे चुकीचं आहे.

First published:

Tags: Viral news