मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मुंगसासोबतच्या तुंबळ लढाईत गंभीर जखमी झाला कोब्रा; आता जबड्याची होणार सर्जरी

मुंगसासोबतच्या तुंबळ लढाईत गंभीर जखमी झाला कोब्रा; आता जबड्याची होणार सर्जरी

कोब्रा भरपूर जखमी असल्यानं औषधांचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी लागणार होती. सवयीप्रमाणे कोब्रा सतत या व्यक्तीला चावण्याचा प्रयत्न करत होता.

  • Published by:  Kiran Pharate

जोधपूर 09 नोव्हेंबर : माणसाची सर्जरी केल्याचं तुम्ही आजपर्यंत अनेकदा ऐकलं असेल. मात्र, एखाद्या सापाची सर्जरी (Surgery of King Cobra) केल्याचं कधी ऐकलंय का? जोधपूरमध्ये (Jodhpur) आज एका किंग कोब्राच्या जबड्याची सर्जरी केली जाणार आहे. जोधपूरमधील एका ठिकाणाहून रेस्क्यू केल्या गेलेल्या किंग कोब्राच्या जबड्याला जखम झाली आहे. यामुळे त्याला काही खाणं-पिणंही शक्य होत नाहीये.

पत्नीनं सतत खोटं बोलून पतीला बनवलं मानसिक रूग्ण; बँक खात्यातून लंपास केले 4 कोटी

किंग कोब्राला रेस्क्यू करणाऱ्या व्यक्तीनं आपल्या घरीच डॉक्टरांचा सल्ला घेत या सापावर प्राथमिक उपचार केले. या व्यक्तीनं दोन दिवसाआधी जोधपूरच्या नांदडी परिसरातील एका घरातून पाच फूट लांब कोब्राला रेस्क्यू केलं. जेव्हा त्यानं कोब्राला पाहिलं तेव्हा त्याचा जबडा भरपूर जखमी झाला होता. या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार मुंगसासोबतच्या भांडणात कोब्राला मार लागल्याची शक्यता आहे.

या व्यक्तीनं कोब्राला रेस्क्यू केल्यानंतर डॉक्टरांसोबत संपर्क साधला. मात्र जोधपूरचे बहुतेक डॉक्टर काल कापरडा येथे गेले होते. कोब्रा भरपूर जखमी असल्यानं औषधांचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी लागणार होती. सवयीप्रमाणे कोब्रा सतत या व्यक्तीला चावण्याचा प्रयत्न करत होता.

बॉयफ्रेंड आंधळा असल्याने अतिशय आनंदी आहे ही तरूणी; सांगितले 5 मोठे फायदे

या व्यक्तीनं कोब्राचा जबडा पकडला. यानंतर अतिशय सावधगिरीनं कोब्राच्या जखमेवर औषध लावलं. या व्यक्तीनं सांगितलं, की आज दुपारी हा साप घेऊन माचिया येथे जाणार आहे. तिथे या सापाच्या जबड्याला झालेली जखम डॉक्टर साफ करतील आणि नंतर यावर टाके घालतील. जवळपास एका आठड्यापर्यंत कोब्र्याच्या जबड्यावर उपचार केले जातील. पूर्णपणे ठीक झाल्यानंतर त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडलं जाईल.

First published:

Tags: King cobra, Shocking news