• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अनोखं गाव; इथे प्रत्येक व्यक्ती आहे शुद्ध शाकाहारी, मांस तर सोडाच पण दुधाचंही नाही करत सेवन

अनोखं गाव; इथे प्रत्येक व्यक्ती आहे शुद्ध शाकाहारी, मांस तर सोडाच पण दुधाचंही नाही करत सेवन

चकित करणारी बाब म्हणजे या गावातील लोक मागील 50 वर्षांपासून शुद्ध शाकाहारी आहेत. या गावाची खासियत हीच आहे की इथला प्रत्येक व्यक्ती विगन आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 09 नोव्हेंबर : जगात अनेक लोक असे आहेत जे मांसाहार तर खात नाहीतच मात्र सोबतच जनावरांपासून मिळणारे प्रोडक्टही वापरत नाहीत. अशा लोकांनी आणि त्यांच्या डायटला विगन असं म्हटलं जातं. आजच्या काळात विगन एक मोहिमच बनली आहे, ज्याच्या माध्यमातून लोक दुसऱ्यांनाही प्राण्यांपासून मिळणारे प्रोडक्ट न वापरण्याबद्दल जागरूक करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गावाबद्दल सांगणार आहोत, जिथे राहणारा प्रत्येक व्यक्ती शुद्ध शाकाहारी आहे (Israel Vegan Village). इज्राईलच्या नेवे शेलॉममध्ये एक डिमोना (Dimona) नावाचं छोटंस गाव आहे. या गावात 3000 यरुशलमचे अफ्रीकन हिब्रू इज्रायली लोक राहतात. चकित करणारी बाब म्हणजे या गावातील लोक मागील 50 वर्षांपासून शुद्ध शाकाहारी आहेत (Totally Vegetarian Village). या गावाची खासियत हीच आहे की इथला प्रत्येक व्यक्ती विगन आहे. इथे चिकन, मटण मासे अशा मांसाचं सेवन तर कोणीच करत नाही पण सोबतच कोणी दूधही पित नाही. पत्नीनं सतत खोटं बोलून पतीला बनवलं मानसिक रूग्ण; बँक खात्यातून लंपास केले 4 कोटी मांस आणि दूधासोबतच डिमोन गावातील लोक आठवड्यात तीन दिवस मीठ खात नाहीत आणि वर्षात चार आठवडे साखर खात नाहीत. या लोकांचं जेवण इतकं साधं असतं की ते त्यात मसाले किंवा इतर कोणते पदार्थही जास्त टाकत नाहीत. लोकांचं असं म्हणणं आहे, की या गावात कोणीही जेवणाची आस्वाद घेण्यासाठी जात नाही. कारण इथल्या लोकांचं जेवण अतिशय बेचव असतं. इथले लोक शरीराला मंदिराप्रमाणे पवित्र मानतात. यामुळे आपलं शरीर त्यांना मांस आणि मसाल्याच्या पदार्थांनी अपवित्र करायचं नाही. आनंद महिंद्रांनी शेअर केला चिमुकल्याचा प्रेरणादायी VIDEO, एकदा बघाच डिमोना गावातील लोकांची आणखी एक खास बाब म्हणजे, हे लोक आपल्या शरीराची पूर्णपणे काळजी घेतात. नास डेलीच्या व्हिडिओनुसार मांसाशिवाय हे लोक कधीही दारू आणि सिगरेट पित नाहीत. इतकंच नाही तर आठवड्यात तीन वेळा व्यायामही करतात. शरीराची इतकी काळजी घेत असल्यामुळेच या लोकांकडे पाहून त्यांचं खरं वय समजत नाही.
  Published by:Kiran Pharate
  First published: