नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : हिमस्खलनादरम्यान (Avalanche) पर्वतावर चढतानाचा एका व्यक्तीचा व्हिडिओ (Shocking Video Viral) सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अत्यंत भितीदायक या व्हिडिओमध्ये, हिमस्खलनादरम्यान एक व्यक्ती आपला जीव धोक्यात घालून पर्वतावर चढण्याचा प्रयत्न करताना स्पष्टपणे दिसतं. जमिनीपासून सुमारे 400 फूट उंचीवर हिमस्खलनाचा तडाखा बसल्यानंतर गिर्यारोहकाने (Mountain Climber) आपला अनुभव शेअर केला आहे. गिर्यारोहक लेलँड निस्की कोलोरॅडोमधील पर्वतावर बर्फाळ मार्गाने चढत असतानाच हिमस्खलनात अडकला. त्यानंतर तो आपल्यासोबत असलेल्या साधनांच्या सहाय्याने वर जाण्याचा प्रयत्न करताना दिसला. हे दृश्य अतिशय भितीदायक आणि मन हेलावून टाकणारं आहे. साप आणि विंचू एकत्र शिजवून तयार केली जाते ही डिश, पाहा या Danger पदार्थाचा VIDEO क्लाइंबिंग मॅगझिननुसार तो व्यक्ती एकटाच होता. अनियंत्रित आणि मोठ्या हिमस्खलनाच्या मार्गाची त्याला जाणीव होती. 8 फेब्रुवारीला सकाळी कमी धोक्याचा अंदाज घेत त्याने चढाईने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा निर्णय योग्य नव्हता. तो पुढे सरकत होता, त्याचदरम्यान जे घडले तो त्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव होता. इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं की गिर्यारोहक लेलँड निस्की पर्वताच्या बाजूला असलेल्या बर्फामध्ये कुऱ्हाडीसारख्या एका टूलचा वापर करत वरती चढण्याचा प्रयत्न करत आहे. https://www.instagram.com/p/CZzo9CrJBNW/?utm_source=ig_web_copy_link व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसतं की हिमस्खलन आदळल्यानंतर या व्यक्तीला स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी साधनांचा वापर करणं भाग पडतं. वरून बर्फ पडत राहतो. हे सर्व घडलं तेव्हा तो जमिनीपासून सुमारे 400 फूट उंचीवर होता. गिर्यारोहकाने क्लाइंबिंग मॅगझिनला सांगितलं की त्याने बर्फ पडताना पाहिलं नव्हतं.
तरुणीने चोरी करायल्या आलेल्या चोरांनाच लुटलं; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात
दोन मिनिटांच्या हिमस्खलनात तो कसा वाचला याबद्दल निस्कीनं सांगितलं की, “मला ठाऊक होतं की मी घाबरलो तर मरेल, म्हणून मी माझा श्वास नियंत्रित ठेवण्यावर आणि पर्वतावर चढण्यासाठी उपकरणे वापरण्यावर लक्ष केंद्रित केलं.” या महिन्याच्या सुरुवातीला शेअर झालेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, यावर भरपूर लोक कमेंटही करत आहेत.