जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अरेच्चा! तरुणीने चोरी करायल्या आलेल्या चोरांनाच लुटलं; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

अरेच्चा! तरुणीने चोरी करायल्या आलेल्या चोरांनाच लुटलं; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

अरेच्चा! तरुणीने चोरी करायल्या आलेल्या चोरांनाच लुटलं; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या दोन व्यक्तींसोबत असं काही घडलं की आता चोरी करण्याआधी ते नक्कीच विचार करतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 27 फेब्रुवारी : सोशल मीडियावर जर तुम्ही सक्रीय असाल तर अनेकदा नवनवीन अजब व्हिडिओ (Weird Videos) पाहायला मिळाले असतीलच. यातील काही व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरत नाही, तर काही व्हिडिओ हैराण करणारेही असतात. काही व्हिडिओ तर असे असतात जे पाहून आपल्याला डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. सोशल मीडियावर अनेकदा चोरीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र कधीकधी समोरचा व्यक्तीचं चोरी करण्यासाठी आलेल्या चोराची फजिती करतो. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्येही असंच काहीसं पाहायला मिळतं (Funny Video of Theft). विद्यार्थ्यांना शिक्षिकेनं दिली अजब शिक्षा; आधी आग लावली अन् मग.., VIDEO चोरांना फक्त चोरी करण्याची संधी शोधायची असते. त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं नसतं की रात्रीच्या अंधारातच चोरी करता येईल. अनेकदा चोर दिवसाढवळ्या आणि गर्दीच्या ठिकाणीही चोरी करून पळ काढतात. मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या दोन व्यक्तींसोबत असं काही घडलं की आता चोरी करण्याआधी ते नक्कीच विचार करतील.

जाहिरात

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुणी रस्त्यावरुन जात असते. यादरम्यान तिथेच असलेल्या दोन चोरांची नजर तिच्या बॅगवर जाते. स्कूटीवर आलेले दोन चोर तिची बॅग हिसकवण्यासाठी गाडीवरुन उतरून तिच्या जवळ जातात. दोघं मिळून तिची पर्स ओढण्याचा प्रयत्न करतात. यानंतर ही तरुणी हुशारी दाखवत आपली पर्स तिथेच टाकते आणि या चोरांची दुचाकी घेऊन तिथून फरार होते. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा मजेशीर व्हिडिओ ठरवून बनवण्यात आलेला असला तरीही तो लोकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे.

ट्रेनखाली येणार होती वृद्ध महिला; इतक्यात मदतीसाठी धावला युवक, घटनेचा LIVE VIDEO

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला असून लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओमध्ये तरुणीची हुशारी पाहाण्यासारखी आहे. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, घोर कलयुग! आता तर चोरांनाही सतर्क राहाण्याची गरज आहे. दुसऱ्या एकाने लिहिलं, बिचारा, चोरी करायची कशी हे शिकून यायला हवं होतं ना. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. आतापर्यंत व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात