जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Yuck! साप आणि विंचू एकत्र शिजवून तयार केली जाते ही डिश, पाहा या Danger पदार्थाचा VIDEO

Yuck! साप आणि विंचू एकत्र शिजवून तयार केली जाते ही डिश, पाहा या Danger पदार्थाचा VIDEO

Yuck! साप आणि विंचू एकत्र शिजवून तयार केली जाते ही डिश, पाहा या Danger पदार्थाचा VIDEO

या विचित्र पदार्थात विंचू (Scorpion and Snake food dish) आणि साप एकत्र खाल्ले जातात. चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात (Guangdong province) एक अतिशय भयानक पदार्थ बनवला जातो.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 27 फेब्रुवारी: जगात असे अनेक विचित्र पदार्थ (Weird Food Dishes) तयार केले जातात की ज्याविषयी माहिती मिळताच लोक आश्चर्य व्यक्त करतात. काही डिशेस या वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचा वापर करून केल्या जातात, तर काही दुसऱ्या वस्तूंचा वापर करून बनवल्या जातात. चीन (China Weird Food) अशा विचित्र डिशेससाठी प्रसिद्ध आहे. तेथे विविध प्राण्यांचं मांस (Meat Of Animals) आणि त्यांच्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात. सध्या सोशल मीडियावर (Social Media Video Viral) अशाच एका नव्या प्रकारची डिश जोरदार चर्चेत आहे. या विचित्र पदार्थात विंचू (Scorpion and Snake food dish) आणि साप एकत्र खाल्ले जातात. चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात (Guangdong province) एक अतिशय भयानक पदार्थ बनवला जातो. या डिशमध्ये दोन अत्यंत विषारी प्राणी ठेवले (Poisonous animals) जातात. यात एक विंचू असतो तर दुसरा साप. उत्तर चीनमध्ये तळलेले विंचू मोठ्या आवडीने खाल्ले जातात. रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये हे सहज उपलब्ध होतात. तथापि, उत्तरेकडील भागात या व्यतिरिक्त त्यांचा वापर केला जात नाही. परंतु, जर दक्षिणेकडील प्रदेशाबद्दल बोलायचं झालं तर येथे विंचू आणि साप हे एका प्रकारच्या सूपमधले विशेष घटक असतात. हे वाचा- 1 लाख रुपयांना मिळतंय बर्गर; पण पैसे खर्चूनही तुम्ही ते खाऊ शकत नाही, वाचा कारण चीनमध्ये तयार केलं जातं सूप हे विशेष सूप विषारी साप आणि विंचवापासून बनवलं जातं. तसंच त्यात डुकराचं मांसही टाकलं जातं. त्यानंतर त्यात काही मसालेही टाकले जातात. हे विशेष प्रकारचे सूप शरीराला डिटॉक्स (Detox) करण्यासाठी उपयुक्त आहे, असा विश्वास चिनी लोकांना वाटतो. स्कॉर्पियन सूप ग्वांगडोंगच्या खास पाककृती आणि संस्कृतीचा एक भाग असला तरी, ते तुम्हाला या प्रांतातील प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये मिळणार नाही. याचे कारण असे की, ही डिश अत्यंत अनुभवी शेफ तयार करतात. या शेफला (Chef) विंचवाच्या शरीरातून विष कसं काढायचं, याची संपूर्ण माहिती असते. विंचवाला हाताळण्याचं कौशल्यदेखील या शेफकडे असतं. पाहा व्हिडीओ

    डिश कशी बनते? विष काढल्यानंतर, विंचू आणि साप सुमारे तीन तास शिजवले जातात. त्यात डुकराचं मांस, साप, लसूण, आलं, मसाले आणि अन्य काही भाज्या मिक्स केल्या जातात. यामुळे विंचावाचे ज्यूस नीट एकत्र होते आणि नंतर त्याचा वापर डिटॉक्ससाठी केला जातो. ज्या लोकांनी या डिशचा आस्वाद घेतला आहे, ते म्हणतात की ही डिश फार किळसवाणी दिसते. ही डिश पाहिल्यानंतर अनेक लोक ती खाऊ शकत नाहीत, परंतु, या डिशची तव अप्रतिम असते. एका रिपोर्टनुसार, खरं तर विंचवाचं केवळ ज्यूस पिणं पुरेसं आहे, परंतु, काही लोक विंचू खाण्याचाही प्रयत्न करतात. हे विंचवाचे सूप उच्च रक्तदाब (High Blood Pressure), तसेच त्वचेशी संबंधित अनेक प्रकारचे आजार बरे करण्यास मदत करते, असं काही तज्ज्ञांचं मत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात