मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'झोपूही देत नाही, काय करू?', नवऱ्याच्या 'त्या' सवयीला वैतागली बायको; तुमच्याकडे आहे का सोल्युशन?

'झोपूही देत नाही, काय करू?', नवऱ्याच्या 'त्या' सवयीला वैतागली बायको; तुमच्याकडे आहे का सोल्युशन?

प्रतीकात्मक फोटो.

प्रतीकात्मक फोटो.

नवऱ्याच्या वाईट सवयीमुळे त्रस्त झालेल्या महिनेने सोशल मीडियावर मांडली व्यथा.

मुंबई, 04 ऑक्टोबर : नवरा-बायको (Husband Wife) म्हटलं की भांडणंच आली (Husband Wife Issues). आपल्या जोडीदारात काही ना काही तरी खटकतंच  (Husband Wife fight). एखादी सवय अशी असते की ज्यामुळे जोडीदाराला त्याचा खूप त्रास होतो. आपल्या नवऱ्याच्या अशाच एका वाईट सवयीला एक महिला इतकी वैतागली आहे (Husband bad habiti) की तिने थेट सोशल मीडियावरच आपली व्यथा मांडली आहे.

नवऱ्यामुळे या महिलेचं झोपणं मुश्किल झालं आहे. आपला नवरा आपल्याला रात्री नीट झोपूही देत नाही (Woman couldn't sleep), असं या महिलेने सांगितलं आहे (Husband let not sleep wife). नवऱ्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही, काय करू काही समजत नाही. असं सांगत तिने आता सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आणि मदत मागितली आहे.

सकाळी लवकर उठायचं असेल तर आपण अलार्म लावतो. बहुतेक वेळा तर आपण अलार्म बंद करून पुन्हा झोपतो. म्हणून एक तर आपण रिपीट अलार्म लावतो किंवा अलार्म होताच स्नूझिंक बटण दाबतो. ज्यामुळे तो एका विशिष्ट वेळेने पुन्हा वाजत राहतो. या महिलेच्या नवऱ्याला असाच अलार्म लावण्याची सवय होती, ज्याचा त्रास तिला व्हायचा.

हे वाचा - VIDEO - क्युट दिराला पाहताच स्वतःला आवरू शकली नाही नवरी; नवरदेवाच्या नकळत...

ही महिला नोकरी करते. तिला रोज सकाळी पाच वाजता कामावर जायचं असतं. तिच्या नवऱ्याला साडेसातला उठायचं असतं. तरी तो साडेसहाचा अलार्म लावतो. कामाच्या दिवशी महिला नवऱ्याचा अलार्म वाजण्याआधीच निघून जाते. पण तिच्या सुट्टीच्या दिवशी जेव्हा नवऱ्याला कामावर जायचं असतं, तेव्हा मात्र तिला हा कर्कश अलार्म ऐकत राहावा लागतो. तिचा नवरा उठायच्या वेळेच्या एक तास आधीचा अलार्म लावून ठेवायचा आणि मग तो पाच-पाच मिनिटांनी वाजत राहतो.

सुट्टी असल्याने महिलेला सकाळी थोडा जास्त वेळ झोपायचं असतं. पण नवऱ्याचा अलार्म तिला झोपू देत नाही. कारण नवरा स्वतः उठत नाही पण अलार्मचं स्नूज बटण दाबत राहतो. महिलेला एक तासभर जास्त झोपायचं असतं ते ती झोपू शकत नाही. फक्त महिलेचीच नाही तर तिच्या मुलांचीही हीच अवस्था आहे. तिने याबाबत अनेकदा आपल्याला नवऱ्याला सांगितलं पण तो ऐकायला तयार नाही. आपण असं केलं नाही तर तो कामावर जायला उशीर होईल आणि नोकरी जाईल, असं कारण तो देतो.

हे वाचा - इथं तरुण, अविवाहितांसाठी मोफत घर; पण पूर्ण कराव्या लागतील 'या' अटी

महिलेची ही पोस्ट पाहून यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. अनेकांनी तिला या समस्येतून सुटण्यासाठी सल्ले दिले आहेत. कुणी तिला नवऱ्याला असं कऱण्यापासून रोखायला सांगितलं, कुणी तिला दुसऱ्या खोलीत झोपायला सांगितलं. महिलेची ही व्यथा आपल्यापैकी बऱ्याच जणांची असेल. अशावेळी तुम्ही काय करता? किंवा तुमच्याकडे यावर काही उपाय आहे का? तर आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Relationship, Wife and husband