नवी दिल्ली 07 जानेवारी : भारत हा जंगल आणि वन्यजीवांच्या बाबतीत इतका समृद्ध देश आहे की इथे जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी लोक लांबून येतात. आजच्या काळात भारतीय लोकांमध्येही जंगल पाहण्याची क्रेझ वाढत आहे. पण जंगलात फिरायला जाणंही काही वेळा धोकादायक ठरू शकतं. लोक कधीकधी अशा चुका करतात की ते स्वतःसोबतच इतरांचा जीवही धोक्यात टाकतात. नुकतंच एका व्यक्तीनं जंगलात असंच काही केलं, ज्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. धावत्या ट्रेनमध्ये चढताना खाली पडला अन् तसाच फरफटत गेला वृद्ध, मग..; धक्कादायक घटनेचा Video Viral भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा ट्विटरवर खूप सक्रिय राहतात आणि प्राण्यांशी संबंधित मनोरंजक व्हिडिओ पोस्ट करत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात एका व्यक्तीचं कृत्य पाहून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
This is going viral. For all the wrong reasons. Tiger tourism sustains local livelihoods & helps in the cause of conservation. Such acts of few morons are giving it a bad name. Please desist from such foolhardy acts & ask ur friends to be sensible during wildlife safari’s. pic.twitter.com/jzUxd1oc6V
— Susanta Nanda (@susantananda3) January 5, 2023
हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी लिहिलं की - “हा व्हिडिओ चुकीच्या कारणाने व्हायरल होत आहे. स्थानिक लोकांनाही व्याघ्र पर्यटनाचा फायदा होतो कारण त्यांचा घरखर्च यावर चालतो आणि प्राण्यांचंही संरक्षण होतं. पण काही लोकांच्या अशा कृतीने संपूर्ण व्यवस्थाच बदनाम होते. कृपया अशा गोष्टी जंगलात अजिबात करू नका आणि असं काही करणाऱ्या तुमच्या मित्रांनाही थांबवा.
व्हिडिओमध्ये एक जंगल दिसत आहे ज्यामध्ये एक प्राणी उभा आहे आणि काही लोक समोर चालत असलेल्या वाघाचा व्हिडिओ बनवत आहेत. इतक्यात एक व्यक्ती हातात फोन घेऊन वाघाचा व्हिडिओ बनवण्यासाठी त्याच्या दिशेने धावताना दिसतो. वाघ त्या व्यक्तीपासून फार दूर नाही. जर तो वळला आणि या व्यक्तीकडे धावू लागला, तर ती व्यक्ती आपला जीव वाचवू शकणार नाही. गाडीवर बसून व्यक्तीनं कचाकचा चावून खाल्ला जिवंत साप; पुढं जे झालं ते थरकाप उडवणारं, Shocking Video या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल 43 हजार व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्यक्तीला लाज वाटली पाहिजे आणि त्याचा फोटो सार्वजनिक करावा, असं एकानं म्हटलं आहे. एकाने विचारलं की, पुढे काय झालं? वाघ मागे फिरला की नाही? एकाने सांगितलं की जंगल सफारीमध्ये लोकांना गाडीतून उतरू दिलं जात नाही, हा व्यक्ती तर वाघाच्या दिशेनं धावत आहे. त्या वाघाने पाठ फिरवली असती किंवा दुसरा वाघ झुडपात लपलेला असता तर काय झालं असतं? असा सवाल यूजरने उपस्थित केला.