नवी दिल्ली 16 ऑगस्ट : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral on Social Media) होत आहे. या व्हिडिओमधील व्यक्तीची हिंमत पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीनं 113 किलोग्राम वजन असेलला 22 फूट साप (Man Carries 22 Feet Long Snake On Shoulder) आपल्या खांद्यावर उचलला आहे.
नवरी समोर येताच गेला नवरदेवाचा तोल; मित्रानं सावरत दिला हा सल्ला, पाहा VIDEO
या व्हिडिओमध्ये सापाला आपल्या खांद्यावर उचलून घेतलेल्या व्यक्तीचं नाव जे ब्रीवर (Jay Brewer) असं आहे. सोशल मीडियावर त्यांचे अनेक सापासोबतचे (Snake Video) तसेच मगरीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यावेळी ते प्राणीसंग्रहालयातील या सापाला एका जागेवरुन दुसरीकडे शिफ्ट करत होते. जे ब्रीवर यांनी स्वतःच इन्स्टाग्रामवर सापासोबतचा आपला हा व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
समोरच्याची नक्कल करायला गेला अन् धाडकन जमिनीवर आपटला; घटनेचा Video Viral
जे ब्रीवर यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ अपलोड करत कॅप्शनमध्ये म्हटलं, की 'जेव्हा 22 फूट लांब आणि 113 किलोग्राम वजनाच्या सापाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत करायला इतर कोणीच नसेल तरी तुम्ही जुन्याच पद्धतीनं हे काम करता'. सापासोबतच्या जे ब्रीवर यांच्या या व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. जे ब्रीवर यांचा हा व्हिडिओ आतापर्यंत करोडो लोकांनी पाहिला आहे आणि 7 लाख 25 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. एका यूजरनं या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, असं वाटतंय की त्यांनी एखाद्या क्यूट लहान बाळाला आपल्या खांद्यावर बसवलं आहे. ही एक शानदार सवारी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking viral video, Snake video