जाहिरात
मराठी बातम्या / Viral / समोरच्याची नक्कल करायला गेला अन् धाडकन जमिनीवर आपटला; घटनेचा Video Viral

समोरच्याची नक्कल करायला गेला अन् धाडकन जमिनीवर आपटला; घटनेचा Video Viral

समोरच्याची नक्कल करायला गेला अन् धाडकन जमिनीवर आपटला; घटनेचा Video Viral

एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीनं केलेल्या स्टंटची (Stunt) नक्कल करायला जातो. मात्र, पुढे त्याच्यासोबत असं काही घडतं, की आयुष्यात आता तो कधीच कोणाची नक्कल करण्याचा विचार करणार नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली 16 ऑगस्ट : आजच्या काळात सोशल मीडिया (Social Media) एक असं माध्यम बनलं आहे, जिथे एकापेक्षा एक मजेशीर गोष्ट पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ हैराण करणार असतात तर काही व्हिडिओ इतके विनोदी (Funny Videos) असतात, की पाहता पाहता हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video on Social Media) होतात आणि नेटकऱ्यांची मनं जिंकतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. तुम्ही असं अनेकदा ऐकलं असेल की कोणाचीही नक्कल करू नये. याच वाक्याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीनं केलेल्या स्टंटची (Stunt) नक्कल करायला जातो. मात्र, पुढे त्याच्यासोबत असं काही घडतं, की आयुष्यात आता तो कधीच कोणाची नक्कल करण्याचा विचार करणार नाही. VIDEO: पहिली ओळ म्हटले आणि थेट शेवटच्या ओळीवर पोहोचले; खासदारच विसरले राष्ट्रगीत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती रेलिंगच्या वरती चढत एकदम आरामात स्टंट करतो. तो एकदम प्रोफेशनलप्रमाणे जमिनीवरुन उडी घेतो आणि रेलिंगवर चढतो तसंच लगेचच खालीही उतरतो. हे संपूर्ण दृश्य शेजारी उभा असलेला दुसरा युवक पाहत असतो. हे पाहून तोदेखील अशाच प्रकारे स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, रेलिंगवर पाय ठेवताच त्याचा बॅलन्स बिघडतो आणि तो धाडकन खाली कोसळतो.

    जाहिरात

    VIDEO: आजीबाईनं वयाच्या 90 व्या वर्षी सुरू केला व्यवसाय; कमाईसोबतच झाल्या Star सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. लोक यावर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. यावर कमेंट करत एका यूजरनं लिहिलं, की कोणाचीही नक्कल करण्याआधी १०० वेळा विचार करायला हवा. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की मजेशीर स्टंट आहे. असा स्टंट मी आजपर्यंत पाहिला नाही. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर comedy_videos9752 नावाच्या पेजवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ हजारो जणांनी पाहिला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात