Home /News /viral /

ऑनलाईन मीटिंगदरम्यान कॅमेरा सुरू झाला अन्...; शिक्षकाचं पार्टनरसोबतच ते कृत्य पाहून उडाला गोंधळ

ऑनलाईन मीटिंगदरम्यान कॅमेरा सुरू झाला अन्...; शिक्षकाचं पार्टनरसोबतच ते कृत्य पाहून उडाला गोंधळ

कपलसाठी खास सुट्टी

कपलसाठी खास सुट्टी

कोरोना महामारीच्या काळात शिक्षकांसमोर येणाऱ्या अडचणींबाबत बातचीत सुरू होती. सर्वजण अगदी लक्ष देऊन हे सर्व ऐकत होते. इतक्यात अचानक एका हायस्कूल टीचरचं बेड दिसू लागलं.

    नवी दिल्ली 23 ऑगस्ट : कोरोना काळात झूम मीटिंगचा (Zoom Meeting) वापर अधिक वाढला आहे. या ऑनलाईन मीटिंगदरम्यान (Online Meeting) अनेक अशा घटनाही समोर आल्या आहेत ज्यामुळे यात सामील झालेल्या लोकांना विचित्र गोष्टींचा सामना करावा लागला आहे. अशीच एक घटना एका शिक्षकासोबतही (Teacher) घडली आहे. या घटनेत आपल्या सहकाऱ्यांसोबत ऑनलाईन मीटिंगमध्ये असलेल्या शिक्षकाला या गोष्टीचं भानच राहिलं नाही की ते काय करत आहेत आणि त्यांना सगळे पाहत आहेत. ही घटना कॅरिबियन देश जमेकातील (Jamaica) आहे. द सननं दिलेल्या वृत्तानुसार, मागील आठवड्यात वार्षिक जमेका टीचर्स असोसिएशन संमेलनासंबंधी एक झूम मीटिंग आयोजित करण्यात आली होती. यात कोरोना महामारीच्या काळात शिक्षकांसमोर येणाऱ्या अडचणींबाबत बातचीत सुरू होती. सर्वजण अगदी लक्ष देऊन हे सर्व ऐकत होते. इतक्यात अचानक एका हायस्कूल टीचरचं बेड दिसू लागलं. यानंतर समोर जे काही दृश्य दिसलं, ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. मस्करीत तिनं युवकाची जीभ ओढली पण ती निघून थेट हातातच आली; Video पाहून व्हाल शॉक लाईव्ह मीटिंगमध्ये सहभागी झालेला हा शिक्षक आपल्या पार्टनरसोबत इंटिमेट होताना दिसला. त्याला कदाचित या गोष्टीची कल्पना नव्हती की त्याचं हे कृत्य सर्वजण पाहत आहेत. तब्बल दोन मिनिट हे सर्व असंच सुरू राहिलं. यानंतर ही मीटिंग डिसकनेक्ट करण्यात आली. आरोपी शिक्षकाविरोधात काही कारवाई केली गेली का, हे अद्याप समोर आलेलं नाही. तरुणीचं चक्क चिंपांझीवर जडलं प्रेम; या कपलसाठी अडथळा ठरतीये ही गोष्ट अशी घटना घडण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही मागील वर्षी ब्राझीलमध्ये नगरपरिषदेच्या बैठकीदरम्यान एक सदस्य ऑन कॅमेरा आपल्या पार्टनरसोबत संबंध ठेवताना दिसला होता. बैठकीत सामील झालेले सदस्य आपले विचार मांडत होते, इतक्यात कॅमेऱ्यावर सेक्स फिल्मप्रमाणे सीन दिसू लागले. लक्ष देऊन पाहिल्यावर या सर्वांच्या लक्षात आलं, की फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती त्यांचाच मेंबर आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून मीटिंग सुरू ठेवण्यात आली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Online meetings, Viral news

    पुढील बातम्या