मराठी बातम्या /बातम्या /Viral /अजबच! तरुणीचं चिंपांझीवर जडलं प्रेम; प्रेमात आकंठ बुडालेल्या या कपलसाठी अडथळा ठरतीये ही गोष्ट

अजबच! तरुणीचं चिंपांझीवर जडलं प्रेम; प्रेमात आकंठ बुडालेल्या या कपलसाठी अडथळा ठरतीये ही गोष्ट

अॅडी टिमरमँस हिचं ज्या चिंपांझीवर प्रेम जडलं (Girl Fall in Love With Chimpanzee) आहे तो बेल्जियमच्या Antwerp Zoo मध्ये कैद आहे. ही मुलगी प्रत्येक आठवड्याला या चिंपांझीला भेटायला जाते

अॅडी टिमरमँस हिचं ज्या चिंपांझीवर प्रेम जडलं (Girl Fall in Love With Chimpanzee) आहे तो बेल्जियमच्या Antwerp Zoo मध्ये कैद आहे. ही मुलगी प्रत्येक आठवड्याला या चिंपांझीला भेटायला जाते

अॅडी टिमरमँस हिचं ज्या चिंपांझीवर प्रेम जडलं (Girl Fall in Love With Chimpanzee) आहे तो बेल्जियमच्या Antwerp Zoo मध्ये कैद आहे. ही मुलगी प्रत्येक आठवड्याला या चिंपांझीला भेटायला जाते

नवी दिल्ली 23 ऑगस्ट : तुम्ही असं अनेकदा ऐकलं असेल की प्रेमात (Love) रंग-रूप, जात, धर्म, देश असं काहीच पाहिलं जात नाही. मात्र, आता प्रेमाचं एक अजब प्रकरण (Weird Love Story) समोर आलं आहे. या घटनेत एका युवतीचं चक्क चिंपांझीवर प्रेम जडलं (Girl Fall in Love With Chimpanzee) . हे प्रकरण समोर आल्यानंतर सगळेच हैराण झाले आहेत. एखाद्या माणसाला प्राण्यावर प्रेम कसं होऊ शकतं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ही घटना बेल्जियम (Belgium) येथील आहे.

WION मध्ये आलेल्या वृत्तानुसार, अॅडी टिमरमँस हिचं ज्या चिंपांझीवर प्रेम जडलं आहे तो बेल्जियमच्या Antwerp Zoo मध्ये कैद आहे. ही मुलगी प्रत्येक आठवड्याला या चिंपांझीला भेटायला जाते. या चिंपांझीचं नाव चिता आहे, त्याच वय 38 वर्ष आहे. युवतीनं सांगितलं, की ती या चिंपांझीवर खूप प्रेम करते. ते दोघंही एकमेकांना एका काचेच्या दोन बाजूंना उभा राहून पाहतात आणि एकमेकांना फ्लाईंग किस देतात. या तरुणीनं चिंपांझीलाच आपला जीवनसाथी मानलं आहे.

VIDEO: महिलेनं युवकाला भर चौकात चपलेनं धू-धू धुतलं; संतापजनक कारण आलं समोर

मात्र, या प्रेमात अडथळा ठरतंय Antwerp Zoo. याच्या मॅनेजमेंटला चिंपांझी आणि तरुणीचं हे प्रेम मान्य नाही. इतकंच नाही तर त्यांनी आता या तरुणीवर बॅन लावलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की चिंपांझी आणि या महिलेचं प्रेम घातक ठरू शकतं. महिलेवर प्रेम करत असल्यानं इतर चिंपांझी या चिंपांझीपासून दूर राहू लागले आहेत. जेव्हा ही महिला नसते तेव्हा तो एकटाच उदास बसलेला असतो.

नवरदेवाला पाहताच सुटला नवरीचा ताबा! लग्नमंडप सोडून रस्त्यावर आली...; VIDEO पाहा

तरुणीचं असं म्हणणं आहे, की Zoo मॅनेजमेंटनं माझ्यासोबत अन्याय केला आहे. Zoo मध्ये येणाऱ्या इतरांना या चिंपांझीसोबत वेळ घालवण्याची परवानगी आहे, तर मला का नाही ? असा सवाल तिनं केला आहे. मी त्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचवत नाही, उलट मी त्याच्यावर खूप प्रेम करते, असं या तरुणीनं म्हटलं.

First published:
top videos

    Tags: Love story, Viral news