जाहिरात
मराठी बातम्या / Viral / डेअरिंग तर पाहा! कुत्र्याने चक्क चित्त्याशीच घेतला पंगा; पुढे जे घडलं ते पाहून व्हाल हैराण

डेअरिंग तर पाहा! कुत्र्याने चक्क चित्त्याशीच घेतला पंगा; पुढे जे घडलं ते पाहून व्हाल हैराण

डेअरिंग तर पाहा! कुत्र्याने चक्क चित्त्याशीच घेतला पंगा; पुढे जे घडलं ते पाहून व्हाल हैराण

शांत बसलेल्या चित्त्याला चिथवण्याचा प्रयत्न या कुत्र्याने केला पण…

  • -MIN READ
  • Last Updated :

कॅनबेरा, 08 जुलै : वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता अशा हिंस्र प्राण्यांशी पंगा घ्यायचा नाही हे कित्येक प्राण्यांनाही माहिती आहे. पण एका कुत्र्याने मात्र तशी डेअरिंग केली. या कुत्र्याने (Dog) चक्क चित्त्याशी पंगा घेतला. या डेअरिंगबाज कुत्र्याचा व्हिडीओ (Dog video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Socia media viral video) होतो आहे. शांत बसलेल्या चित्त्याला या कुत्र्याने (Dog and cheetah video) चिथवण्याचा प्रयत्न केला. आ बैल मुझे मार किंवा आपल्याच पायावर कोयता मारणं असंच काहीसं हा कुत्रा करताना दिसतो आहे. आपल्या परिसरात शांतपण बसलेल्या चित्त्याच्या जवळ जाऊन त्याच्यावर भुंकून, त्याला राग देण्याचा प्रयत्न या कुत्र्याने केला. व्हिडीओत पाहू शकता. चित्ता शांत बसून आराम करतो आहे. तर त्याच्याच एरिआत घुसून त्याच्या अगदी समोर उभा राहून एक कुत्रा भुंकताना दिसतो आहे. हे वाचा -  Shocking! टॉयलेट सीटवर बसताच गुप्तांगाला चावला भलामोठा अजगर आणि… कुत्रा फक्त भुंकतच नाही तर चित्त्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न करतो. आपलं तोंड तो वारंवार चित्त्याकडे नेतो. कधी त्याचे पाय, कधी त्याची शेपटी आपल्या तोंडात धरण्याचा प्रयत्न करतो. तर मध्येच त्याच्या पाठीवरही चावण्याचा प्रयत्न करतो. पण चित्ता मात्र अगदी शांत बसून आहे. तो कुत्र्याकडे सतत पाह राहतो. तो कुत्र्याला असं करताना पाहून पंजा वरसुद्धा उचलतो. तेव्हा आपल्या  आता या कुत्र्याचं काही खरं नाही असंच आपल्याला वाटतं. पण सुदैवाने चित्ता कुत्र्याला काहीच करत नाही. थोड्या वेळाने कुत्रा त्याच्यापासून दूर जातो पण तो आपलं भुंकणं काही थांबवत नाही. हे वाचा -  सावधान, पुढे धोका आहे! चक्क हायवेवर शतपावली करतायेत 5 सिंह; धडकी भरवणारा VIDEO डेली मेल च्या रिपोर्टनुसार हा व्हिडीओ कॅनबेरा प्राणीसंग्रहायलातील (Canberra’s National Zoo and Aquarium) आहे. तिथल्या उपस्थित लोकांनी हे दृश्यं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात