नवी दिल्ली 28 मार्च : आपल्या आयुष्यातील काही अचानक होणाऱ्या आणि महत्त्वाच्या खर्चांपैकी एक म्हणजे हॉस्पिटलचं मोठे बिल. आजार असेल तर दवाखान्यात जाणंही आवश्यक असतं आणि तिथला खर्चही नाकारता येत नाही. अशाच एका व्यक्तीला 2 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर 52 लाखांचं बिल आलं (Hospital Charges 52 Lakh bill for 2 days), त्यानंतर रुग्णालयातून घरीच येताच त्याने स्वतःच एक्स-रे मशीन बनवलं (Patient Builds own X-ray Machine). सहजच Google वर सर्च केलं आईचं नाव; समोर आलेलं सत्य जाणून हादरला तरुण यूट्यूबवर व्हिडिओ बनवणारा विल ओस्मान हा इंजिनिअर आहे. आजारी पडल्यावर त्याने दवाखान्यात जाऊन उपचार घेतले. ओस्मानला तिथे 2 दिवस भरती ठेवावं लागलं आणि यावेळी त्याला मिळालेले उपचार अगदी प्राथमिक होते. जेव्हा त्याला या प्राथमिक उपचाराचा खर्च $69,000 म्हणजेच 52 लाख 63 लाख रुपये आला तेव्हा ओस्मानचं इंजिनीअर डोकं मेडिकलकडेही धावू लागलं. सुदैवाने, विल ओस्मानने वैद्यकीय विमा घेतला होता आणि या बिलासाठी त्याला त्याच्या खिशातून फक्त $2,000 म्हणजेच 1.5 लाख रुपये द्यावे लागले. बाहेर येताच 52 लाखांचं बिल चुकीचं सिद्ध करूनच दाखवायचं, असा विचार ओस्मानने केला. फक्त काही अँटीबायोटिक्स आणि एक्स-रेसाठी त्याला एवढं बिल भरावे लागलं. अशा परिस्थितीत कंटेंट क्रिएटर ओस्मान याने स्वतःच एक्स-रे मशीन बनवण्यास सुरुवात केली. त्याने या मशीनची किंमत दीड लाख रुपयांपेक्षा कमी ठेवली. धन्यच आहे! बाईककडून स्कॉर्पिओचं करवून घेतोय काम; 6 जणांना बसवून Bike Ride, पोलीस हैराण विल ओस्मानने तयार केलेल्या मशीनसाठी $400 चा वीज पुरवठा आणि $155 एक्स-रे व्हॅक्यूम ट्यूबची गरज होती. याशिवाय त्याने काही गीजर काउंटर आणि शीट मेटल रोलसह हा प्रयोग सुरू केला. Unilad सोबत बोलताना त्याने सांगितलं की एक्स-रे पाहण्यासाठी विशेष मटेरियल शीट आणि इंटेन्सिव्ह स्क्रीनची गरज आहे, ज्यावर किरण पाहता येतील. त्याने DSLR कॅमेऱ्याने फोटॉन्स कॅप्चर केले आणि 40 किलोवॅट सिलिकॉन इन्सुलेटेड वायर आणि ट्यूब वापरून हे साध्य केलं. डेमोनंतर ओस्मानने हे मशीन डिसमेंटल केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.