जाहिरात
मराठी बातम्या / Viral / सहजच Google वर सर्च केलं आईचं नाव; समोर आलेलं सत्य जाणून हादरला तरुण

सहजच Google वर सर्च केलं आईचं नाव; समोर आलेलं सत्य जाणून हादरला तरुण

सहजच Google वर सर्च केलं आईचं नाव; समोर आलेलं सत्य जाणून हादरला तरुण

नुकतंच एका व्यक्तीला इंटरनेटद्वारे त्याच्या जन्मदात्या आईबद्दल असं काही सत्य समजलं की त्याला धक्काच बसला. सत्य जाणून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली (Man Found Shocking thing About Mother on Google).

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 28 मार्च : प्रत्येक व्यक्ती आपल्या आई-वडिलांशी भावनिकरित्या खूप जोडली गेलेली असते. ही व्यक्ती त्यांच्यासाठी जीवही देऊ शकते, प्रत्येक सुख-दु:खात साथ देण्याचा प्रयत्न करते, पण जेव्हा आई-वडील काही संकटात सापडतात तेव्हा मुलांना अतिशय वेदना होतात. नुकतंच एका व्यक्तीला इंटरनेटद्वारे त्याच्या जन्मदात्या आईबद्दल असं काही सत्य समजलं की त्याला धक्काच बसला. सत्य जाणून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली (Man Found Shocking thing About Mother on Google). नवऱ्याच्या निधनानंतर 4 वर्षांनी समजलं की पती देत होता धोका; महिलेनं शेअर केली अजब घटना डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या लीड्समध्ये राहणारा 30 वर्षीय रीस मॅडिक आणि त्याच्या भावाला अॅलन आणि कॅरोल मॅडिक यांनी तेव्हा दत्तक घेतलं होतं जेव्हा हे दोघंही अगदी लहान होते. मात्र त्यांना त्यांची खरी आई लिंडा मॅकआरिटी हिला अधूनमधून भेटण्याची परवानगी होती. सर्वकाही ठीक चाललं होते, पण त्यांची खरी आई लिंडाने त्यांना सलग तिसऱ्या ख्रिसमससाठी घरी बोलावलं नसल्याने त्यांची चिंता वाढली. रीकेला लिंडाबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. तो आईला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. गेल्या महिन्यात, रीके रात्री 2 वाजता लिंडाचा विचार करत मोबाईल बघत होता. अचानक त्याच्या लक्षात आलं की लिंडाला गुगलवर सर्च करावं. त्याला वाटलं की आपल्याला तिच्याबद्दल काहीतरी नवीन सापडेल, पण Google वर शोधल्यावर जे सापडलं ते खूप धक्कादायक होतं.

News18

2018 मध्ये रीकेची खरी आई लिंडा मरण पावल्याचं त्याला गुगलमुळे समजलं. तिची कोणीतरी हत्या केली होती. एका लेखात लिंडाबद्दल लिहिलेल्या गोष्टी वाचून रीके थक्क झाला. त्याला समजलं की त्याची आई ड्रग्ज घेत असे (Drug Addict Mother) आणि ड्रग्जच्या भांडणात दुसऱ्या व्यक्तीने तिचा खून केला. इयान कार असं या मारेकऱ्याचं नाव असून त्याला १७ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली. जेव्हा रीके 16 वर्षांचा होता, तेव्हा त्याला समजलं होतं की त्याची आई ड्रग्ज घेते, म्हणून त्याने त्याच्या आईपासून दूर राहाण्यास सुरुवात केली. परंतु ती त्याच्या वाढदिवस आणि ख्रिसमसला त्याला फोन करायची. महिलेनं रुग्णालयातूनच केली नवजात बाळाची चोरी; 19 वर्षांनी समोर आलं सत्य पण… आईच्या मृत्यूची बातमी कळताच रीकेला धक्का बसला. ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवल्याचा आरोप त्याने पोलिसांवर केला. मात्र पोलिसांचं असं म्हणणं आहे, की लिंडाच्या मृत्यूची बातमी आम्ही तिच्या बहिणीला दिली, तेव्हाही तिने लिंडाला दोन मुलं असल्याचं आम्हाला सांगितलं नाही. आता रीकेला इयानला भेटून गे जाणून घ्यायचं आहे, की त्याने रीकेच्या आईला का मारलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात