मराठी बातम्या /बातम्या /Viral /धन्यच आहे! बाईककडून स्कॉर्पिओचं करवून घेतोय काम; 6 जणांना बसवून Bike Ride, पोलीस हैराण

धन्यच आहे! बाईककडून स्कॉर्पिओचं करवून घेतोय काम; 6 जणांना बसवून Bike Ride, पोलीस हैराण

पोलिसांकडून चेकिंग सुरू होतं. त्यावेळी हे दृश्य पाहताच पोलिसांना हातच जोडले.

पोलिसांकडून चेकिंग सुरू होतं. त्यावेळी हे दृश्य पाहताच पोलिसांना हातच जोडले.

पोलिसांकडून चेकिंग सुरू होतं. त्यावेळी हे दृश्य पाहताच पोलिसांना हातच जोडले.

पाटना, 27 मार्च :  जर तुम्हाला विचारलं की, मोटरसायकलवर किती लोक बसू शकतात तर उत्तर असेल दोन किंवा तीन. तसं पाहता दोनहून जास्त प्रवाशांनी बाईकवर बसणं सुरक्षित नसतं. मात्र जर तुम्हाला सांगितलं की, एका बाईकवर (Motorcycle) तब्बल सहा जणं प्रवास करतात तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? अर्थात..असंच हैराण करणारं वृत्त बिहारमधील शिवहर (Sheohar) येथून समोर आलं आहे.

शिवहर पोलिसांनी (Sheohar Police) बाईकवरुन जाणाऱ्या एका दाम्पत्याला हात जोडून नमस्कार केला आणि ही स्कॉर्पिओ नसून बाईक असल्याचं सांगितलं, अन् त्यानुसार बाईकवरुन प्रवास करण्याची विनंती केली. ते सध्या ज्या पद्धतीने प्रवास करीत आहेत, अशात अपघाताला निमंत्रण आहे. ही घटना शहरातील नवाब हाय स्कूल जवळील आहे. रविवारी येथे पोलीस चेकिंग करीत होते. यादरम्यान एक व्यक्ती एक वा दोन नाही तर कुटुंबाच्या सहा सदस्यांना बाईकवर बसवून घेऊन जात होता. तेथील पोलिसांनी हे पाहिलं तर तेदेखील हैराण झाले.

हे ही वाचा-OMG! गेंड्यासोबत बिबट्याने असं काही केलं की पाहून नेटिझन्स थक्क; VIDEO VIRAL

पोलिसांनी मोटरसायकल थांबवली आणि त्यांना असं करू नको म्हणून विनंती केली. बाईकला बोलेरो किंवा स्कॉर्पिओ समजून ती व्यक्ती सहा जणांसोबत बाईकवरुन प्रवास करीत होती. यानंतर बाईक स्वारानेही माफी मागितली. यापुढे अशी चूक होणार नसल्याचंही सांगितलं. रस्त्यावर सर्व सुरू असताना कोणीतरी त्यांचा फोटो काढला. हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Bihar, Bike riding