नवी दिल्ली 08 जानेवारी : घरामध्ये श्वान पाळायला (Pet Dog) काही लोकांना आवडतं, तर काही लोक श्वानाला अतिशय ईमानदार प्राणी मानतात म्हणून श्वान पाळतात. चीनमधील एका व्यक्तीनेही नुकतंच असाच विचार करून श्वानाचं एक पिल्लू पाळलं. मात्र, त्याला याची कल्पनाही नव्हती की तो ज्याला श्वान म्हणून पाळत आहे, तो खरंतर एक उंदीर आहे (Man Brings Rat Thinking it as Dog). खुर्चीवर बसलेल्या कर्मचाऱ्यासोबत घडलं भलतंच; पाहून सगळेच शॉक, Watch Video हे वाचून तुम्हीही गोंधळात पडले असाल की एखादा उंदीर कुत्र्याप्रमाणे कसा वाटू शकतो. मात्र हे संपूर्ण प्रकरणच अतिशय अजब आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या शंघाई शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपलं एकटेपण दूर करण्यासाठी कुत्र्याचं पिल्लू पाळण्याचा निर्णय घेतला. त्याने असा विचार केला की हा श्वान घराचं रक्षणही करेल आणि त्याचाही वेळ याच्यासोबत जाईल. मात्र हा श्वान मोठा होऊ लागला, तर त्याच्यात कुत्र्याप्रमाणे काहीही लक्षणं दिसत नव्हती. या श्वानाला पाहून मालकही बुचकळ्यात पडला, की नक्की गडबड काय आहे. त्याच्याकडील श्वान इतर कुत्र्यांप्रमाणे चलत किंवा पळत आणि भुंकतही नव्हता. अखेर मालकाने आपल्या या पाळीव प्राण्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या व्यक्तीने आपल्या श्वानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच धक्कादायक सत्य समोर आलं. अद्भुत! …अन् मशरूममधूनही ऐकू आली मधूर धून; कधीच ऐकलं नसेल असं Mushroom music लोकांनी या व्यक्तीला सांगितलं की हा फोटो श्वानाचा नसून उंदराचा आहे. दिसायला तो हुबेहूब कुत्र्यासारखा असला तरी प्रत्यक्षात बॅम्बू रॅट म्हणजेच बांबूमध्ये राहणारा उंदीर म्हणतात. उंदराची ही प्रजाती विशेषतः चीनमध्ये पाहायला मिळते. या व्यक्तीला हा प्राणी पहाडी भागात सापडला होता. या प्राण्याला कुत्रा समजून हा व्यक्ती आपल्यासोबत घेऊन आला. अशीच आणखी एक घटना चीनमधीलच एका व्यक्तीसोबत घडली होती. यात या व्यक्तीने कुत्रा समजून तब्बल ३ वर्ष एक अस्वल पाळलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.