उटावा, 08 जानेवारी : म्युझिक (Music) म्हटलं की बरीच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. पण जर तुम्ही नीट कान देऊन ऐकलं तर निसर्गातूनही तुम्हाला संगीत ऐकू येईल . घोंगावत जाणारा वारा, त्याच वाऱ्याने सळसळणारी झाडं, झुळुझुळु वाहणारं पाणी याच्या आवाजाचा एक वेगळाच नाद असतो अशाच आणखी एका अद्भुत अशा नैसर्गिक संगीताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हे संगीत चक्क मशरूममधून ऐकू येतं आहे (Mushroom Music video). मशरूम तुम्हाला माहितीच आहे. छत्रीसारखा आकार असणारं हे कवक. तुम्ही मशरूमची भाजीही खाल्ली असेल. पण कधी मशरूममधून म्युझिक ऐकलं आहे का? याच मशरूम म्युझिकचा हा सुंदर असा व्हिडीओ आहे (Music out of Mushroom video). ज्यात तुम्हाला वेगवेगळ्या मशरूममधीन वेगवेगळी मधूर धून ऐकायला मिळेल. इंडियन क्लासिकल म्युझिक शिकलेला कॅनडातील तरुण नायरने म्युझिकला एका वेगळ्याच स्तरावर नेलं आहे. त्याने मशरूममधूनही म्युझिक तयार केली आहे. हे वाचा - कमालच झाली! चक्क माशाने केली Driving; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने मशरूम म्युझिकचे असे काही व्हिडीओ शेअर केला आहेत. ज्यामध्ये तो मशरूमच्या एखाद्या भागाला अॅलिगेटर क्लिप जोडतो आणि त्यानंतर मशीनमधून संगीत ऐकू येतं.
आता खरंच प्लँटमधून संगीत ऐकायला येतं का तर नाही. ही म्युझिक म्हणजे प्लँटमध्ये असलेल्या पाण्याच्या हालचालीचा हा आवाज आहे. हे वाचा - अंगमेहनत नाही, वॉशिंग मशीनचीही गरज नाही; कपडे धुण्याचा देशी जुगाड व्हिडीओ पाहाच याबाबत सांगताना तरुणने सांगितलं की हे म्युझिक प्लँटने निर्माण केलंलं नसतं. तर त्या प्लँटमधील पाण्याच्या हालचालीचा मी इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स म्हणून वापर करतो. त्यामुळे जेव्हा मी प्लँटला सर्किट केबल जोडतो तेव्हा प्लँटच्या नॅच्युरअल बायोइलेक्ट्रिकल चार्ज मॅनिफेस्टमुळे यातील इलेक्ट्रिकल रेझिस्टन्समधील छोटासा बदलही म्युझिकसारखा ऐकू येतो.
सोप्या भाषेत सांगायचं तर प्लँटची एनर्जी लेव्हल ऑडिबल टोन्समध्ये रूपांतरिक करतो. हे सर्व मी इंडियन क्लासिकल म्युझिकमधून शिकलो, असं तरुणने सांगितलं.