जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं; प्रियकरानं गर्लफ्रेंडला जमिनीवर पाडून बेशुद्ध होईपर्यंत लाथांनी मारलं

जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं; प्रियकरानं गर्लफ्रेंडला जमिनीवर पाडून बेशुद्ध होईपर्यंत लाथांनी मारलं

जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं; प्रियकरानं गर्लफ्रेंडला जमिनीवर पाडून बेशुद्ध होईपर्यंत लाथांनी मारलं

प्रेयसी आपल्या प्रियकराकडे लग्नासाठी हट्ट करताना दिसते. मात्र, नाराज होऊन प्रियकर अतिशय निर्दयीपणे प्रेयसीला कानशिलात लगावतो. इतक्यावर तो थांबत नाही तर पुढे तिला जमिनीवर पाडून लाथांनी जबर मारहाण करतो

  • -MIN READ Madhya Pradesh
  • Last Updated :

भोपाळ 25 डिसेंबर : प्रेमात माणूस इतर सगळं विसरून जातो, असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा हे प्रेमच अतिशय भयानक रूप घेतं. जोडप्यामधील एकाने दुसऱ्यासोबत अतिशय धक्कादायक कृत्य केल्याच्या किंवा हत्या केल्याच्याही घटना समोर येत असतात. आता आणखी एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Video : आधी विजेच्या तारेवर चढला आणि… प्रेयसीसाठी तरुणाचं धक्कादायक पाऊल यात प्रेयसी आपल्या प्रियकराकडे लग्नासाठी हट्ट करताना दिसते. मात्र, नाराज होऊन प्रियकर अतिशय निर्दयीपणे प्रेयसीला कानशिलात लगावतो. इतक्यावर तो थांबत नाही तर पुढे तिला जमिनीवर पाडून लाथांनी जबर मारहाण करतो. तो तिच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर लाथांनी मारतो. यात ही तरुणी तिथेच बेशुद्ध होते. मारहाणीमुळे मुलगी रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडून होती. ही संपूर्ण घटना शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. यादरम्यान गावातील काही लोक घटनास्थळी पोहोचले. ज्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला रुग्णालयात दाखल केलं. या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे. मात्र तो विचलित करणारा असल्याने बातमीमध्ये दाखवला गेला नाही. गर्दीच्या ठिकाणीच अचानक रस्ता खचला अन् वाहनांसह अख्खा बाजार जमिनीत सामावला, Shocking Video या प्रकरणाबाबत मऊगंज एसडीओपी नवीन दुबे यांनी सांगितलं की, ही घटना गेल्या बुधवारी घडली. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं आहे. मारहाण करणारा तरुण ढेरा गावचा रहिवासी आहे. पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या मुलीच्या आईने कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपी तरुणावर कलम-151 अन्वये कारवाई केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात