मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पत्नीला भेटण्यासाठी झाला उतावळा; VISA नसल्याने समुद्रामार्गे थायलंडहून मुंबईला निघाला पण...

पत्नीला भेटण्यासाठी झाला उतावळा; VISA नसल्याने समुद्रामार्गे थायलंडहून मुंबईला निघाला पण...

Photo credit : Facebook (3rdNAC)

Photo credit : Facebook (3rdNAC)

भारतातील मुंबईमध्ये राहाणाऱ्या आपल्या पत्नीला भेटण्यासाठी हा व्यक्ती थायलंडच्या फुकेत येथील किनाऱ्यावरुन निघाला (Man attempted to Paddle from Thailand to India to see Wife). तब्बल 2 आठवडे प्रवास केल्यानंतर एका मच्छिमाराने त्याला पाहिलं

पुढे वाचा ...
  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 25 मार्च : प्रेमात (Love) माणूस काहीही करू शकतो, हे तुम्ही अनेकदा ऐकलं किंवा वाचलं असेल. याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात एक व्यक्ती आपल्या पत्नील भेटण्यासाठी इतका उतावळा झाला की व्हिसा नसल्याने त्याने विमानाचं तिकीट न काढता समुद्राच्या रस्त्याने पत्नीकडे जाण्याचा निर्णय घेतला. भारतातील मुंबईमध्ये राहाणाऱ्या आपल्या पत्नीला भेटण्यासाठी हा व्यक्ती थायलंडच्या फुकेत येथील किनाऱ्यावरुन निघाला (Man attempted to Paddle from Thailand to India to see Wife). तब्बल 2 आठवडे प्रवास केल्यानंतर एका मच्छिमाराने त्याला पाहिलं आणि थायलंडच्या नौदलाला याची माहिती दिली.

डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून 21 दिवसात 15 तरुणांना केलं डेट; महिलेनं लोकांना दिल्या खास टिप्स

थायलंडच्या नौदलाने ताबडतोब त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला वाचवलं आणि नंतर अटक केली. पत्नीला भेटण्यासाठी त्याने समुद्रमार्गे जाण्याचा विचार केल्याचं चौकशीत उघड झालं. त्या व्यक्तीने दोन आठवड्यांत फक्त 50 मैल (सुमारे 80 किमी) अंतर कापलं होतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, थायलंडमधील हो होआंग हुंग नावाचा एक व्यक्ती रबरी कयाकमध्ये बसून मुंबईला रवाना झाला. होआंग मूळचा व्हिएतनामचा आहे आणि त्याने थाय हॉलिडे बेटावरून प्रवास सुरू केला. जिथून प्रवास सुरू झाला तिथून समुद्रमार्गे मुंबईचं अंतर सुमारे 2000 किमी आहेनेव्हिगेशन सिस्टीमशिवाय तो रबरी नावेमध्ये इंस्टंन्ट न्यूडल्स घेऊन प्रवासाला निघाला होता. थायलंडपासून 80 किमी अंतरावर असलेल्या सिमिलन बेटावर पोहोचल्यावर काही मच्छिमारांची नजर त्याच्यावर पडली. त्यानंतर थायलंडच्या नौदलाला याबाबत माहिती देण्यात आली आणि या व्यक्तीला वाचवलं गेलं.

अर्धांगवायूमुळे 7 वर्ष बोलू शकला नाही; ऑपरेशन होताच केली अशी मागणी की डॉक्टरही शॉक

थायलंड मेरिटाइम एन्फोर्समेंट कमांड सेंटरचे कॅप्टन पिचेट सॉन्गटान यांच्या म्हणण्यानुसार, होआंग हंग यानं सांगितलं की, मुंबईत राहणाऱ्या त्याच्या पत्नीकडे जाण्यासाठी त्यानी सागरी मार्ग निवडला. कोरोनामुळे तो दोन वर्षांपासून पत्नीपासून दूर आहे. त्याच्या नावेमध्ये नकाशा, जीपीएस किंवा कंपास नव्हता. कपडे आणि पाणीदेखील मर्यादित होतं. व्हिसाशिवाय भारतात जाऊ शकत नाही, हे माहिती असल्याने त्याने फुकेत येथून एक कयाक विकत घेतला आणि 5 मार्च रोजी तो प्रवासासाठी निघाला. मात्र, समुद्रात अडकल्यामुळे त्याला दोन आठवड्यात फार कमी प्रवास करता आला. अधिकाऱ्याने सांगितलं की त्यांनी व्हिएतनाम आणि भारताच्या दूतावासात चर्चा केली, परंतु अद्याप उत्तर मिळालेलं नाही.

First published:

Tags: Love story, Viral news