नवी दिल्ली 25 मार्च : दारूचं व्यसन (Alcohol Addict) खूप वाईट आहे. आरोग्य तज्ज्ञ लोकांना नेहमी दारू सोडण्याचा सल्ला देतात. मात्र मद्यपींना या सगळ्याचा काहीही फरक पडत नाही. एकदा दारूची चव चाखली तर नंतर अनेकजण कितीही वर्ष दारू प्यायली नाही तरी संधी मिळताच पुन्हा दारू पिण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रकार जर्मनीतून समोर आला आहे. इथे राहणारी एक व्यक्ती, ज्याची ओळख लपवली गेली आहे, ती गेल्या सात वर्षांपासून अर्धांगवायूमुळे बोलू शकत नव्हती. पण डॉक्टरांनी त्याच्या मेंदूमध्ये दोन मायक्रोचीप टाकताच (Microchip In Brain) त्याने सर्वप्रथम बिअरची मागणी केली. बाबो! फक्त एक मिनिट कपलने केलं असं काम; तब्बल 19 हजार कोटी रुपयांचं बिल आलं जर्मनीतील या रुग्णाचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे. मात्र 2015 पासून आजारपणामुळे त्याला बोलता येत नसल्याची माहिती मिळाली आहे. सुमारे सात वर्षांनंतर डॉक्टरांनी त्याच्या मेंदूमध्ये दोन मायक्रोचिप टाकल्या. या मायक्रोचिप कॉम्प्युटरच्या माध्यमातून काम करतात. यातून आता रुग्णाला खाण्यासाठीच्या वस्तू मागवता येतील, अशी अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली होती. मात्र त्याच्या मेंदूमध्ये ही चीप घातल्याबरोबर त्याने पहिली बिअर मागवली. आजारपणामुळे रुग्णाला बोलता येत नव्हतं. अशा परिस्थितीत, संशोधकांनी त्याच्या मेंदूच्या त्या भागात एक माइंड रीडिंग चिप लावली, जो हालचालीसाठी जबाबदार आहे. उज्वल चौधरी आणि नील्स बिरबोमर या संशोधकांनी त्याच्या मोटर कॉर्टेक्समध्ये एक चिप बसवली. पूर्वी रुग्ण केवळ डोळ्यांच्या हालचालीवरून कुटुंबीयांशी आणि डॉक्टरांशी बोलत असे. यातूनच त्याचा मुद्दा सर्वांना समजायचा. मात्र आता तंत्रज्ञानाच्या मदतीने डॉक्टर त्याचे मन वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. कसं शक्य आहे? ना प्रेग्नन्सीची लक्षणं, ना बेबी बम्प; रात्री पोटात वेदना झाल्या आणि सकाळी महिलेने अचानक दिला बाळाला जन्म व्यक्तीच्या मेंदूतील चिप न्यूरोफीडबॅक तंत्रज्ञानावर काम करते. यामध्ये मेंदूच्या हालचाली संगणकावरून चिपद्वारे नियंत्रित केल्या जातात. संशोधकांच्या मते, अवघ्या दोन दिवसांत त्या व्यक्तीने चीप नियंत्रित करणं आणि त्याचे शब्द संगणकात डीकोड करणं शिकलं. यानंतर त्याने सर्वप्रथम बिअरची मागणी केली, हे पाहून संशोधकही आश्चर्यचकित झाले. आता व्यक्तीवर सतत पाळत ठेवून या तंत्रावर काम केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.