जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नागिणीच्या मृत शरीराजवळ नागाचा पहारा, मुंगसाने प्राण घेतल्यानंतरचा Video समोर

नागिणीच्या मृत शरीराजवळ नागाचा पहारा, मुंगसाने प्राण घेतल्यानंतरचा Video समोर

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

हे दृश्य पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातूनही गर्दी जमली आणि काही लोकांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 05 जानेवारी : सोशल मीडियावर आपल्यासमोर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही मनोरंजक असतात. तर काही विचार करायला भाग पाडतात. तसेच येथे आपल्याला प्राण्यांशी संबंधी देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या अशाच एका सापाच्या जोडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही कहाणी ऐकून तुम्हाला नक्कीच सिनेमातील कहाणी असल्याचे वाटेल. पण ही रील नाही रिअल लाईफ स्टोरी आहे. खरं तर हे संपूर्ण प्रकरण बिलसी पोलीस स्टेशन परिसरातील नागला डल्लूचे आहे. या भागात नागाची जोडी अनेकदा दिसायची. पण एका रात्री मुंगूसाने नागिणीला मारले, तेव्हापासून नाग, या मेलेल्या नागिणीजवळ फणा काढून तिचे रक्षण करत बसला आहे. हे ही पाहा : महिला नागा साधूंचे हे रहस्य जाणून तुम्हाला धक्का बसेल हे दृश्य पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातूनही गर्दी जमली आणि काही लोकांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. गावातील लोक सांगतात की हे जोडपे देवळात तसेच अनेक ठिकाणी एकत्र दिसले होते. रात्री उशिरा मुंगूस आणि नागामध्ये भांडण झाले, त्यात नागिणीचा मृत्यू झाला, तेव्हापासून हा नाग तिच्या शरिराचे रक्षण करत बसला आहे.

या ठिकाणी दोन्ही सापांचे वास्तव्य असल्याचे गावकरी प्रेमपाल यांनी सांगितले. काल दोघेही बाहेर आले असता त्यांच्यावर मुंगुसाने हल्ला केला, त्यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण बचावला. तेव्हापासून हा दुसरा साप तेथेच त्याचे रक्षण करत बसला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

हा व्हिडीओ लोकांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल केला आहे. लोकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या रिएक्शन दिल्या आहेत. तसेच या व्हिडीओंना लाखो व्ह्यूज देखील मिळाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात