नवी दिल्ली, 05 जानेवारी : सोशल मीडियामुळे अलीकडेच कोणीही रातोरात सेलेब्रिटी बनतोय. सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीनं केल्यास ते आर्थिक उत्पन्न मिळवण्याचं महत्त्वाचं साधन होऊ शकते, हे अनेकांनी दाखवून दिलं आहे. एवढंच काय, तर अनेकांसाठी सोशल मीडिया म्हणजे करिअरची नवीन वाट ठरत आहे. एक यूट्यूबर स्मशानभूमी किंवा भीतिदायक ठिकाणी जाऊन व्हिडिओ तयार करून लाखो रुपये कमावतो. त्याच्याबद्दल जाणून घेऊ या. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
आजच्या काळात सोशल मीडिया अनेकांसाठी आशेचा नवा किरण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य माणूसही रातोरात स्टार बनतोय. तुमच्याकडे काही तरी वेगळं करण्याचं कौशल्य असेल, तर तुमच्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमावणं ही मोठी संधी आहे. यूट्यूबर रविकुमार राव यांनी या संधीचा फायदा घेतला व माध्यमातून लाखो रुपये कमावण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा : दमदार बॅटरी अन् 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला Redmiचा तगडा स्मार्टफोन, किंमतही बजेटमध्ये
यू-ट्यूबसाठी व्हिडिओ बनवणं रवी यांच्यासाठी सोपं नव्हतं; पण शेवटी त्यांची मेहनत फळाला आली. रविकुमार राव यांनी RkRHistory हे यू-ट्यूब चॅनेल सुरू केलं. ते त्यांच्या यू-ट्यूब चॅनेलसाठी हॉटेंड व्हिडिओ बनवतात. रविकुमार यांच्यामध्ये काही तरी करण्याची हिंमत होती. म्हणूनच त्यांनी त्यांच्या भीतीला एक शक्ती बनवलं आणि आज त्याच्याकडे सर्व काही आहे. रविकुमार यांची ही गोष्ट प्रेरणादायी आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात चांगली आणि वाईट वेळ येत असते. रविकुमार रावही त्याला अपवाद नव्हते. त्यांना लहानपणापासूनच वाचन आणि लेखनाची आवड नव्हती. यासाठी त्यांना घरातल्यांकडून अनेक टोमणेही ऐकावे लागले. रवी म्हणतात, 'तो काळ असा होता की मी कोणाला रोखू शकत नव्हतो. मला घरात फार मान नव्हता. जेवल्यानंतर घरातच एका बाजूला पडून राहायचो.'
रविकुमार यांच्या आयुष्यात खूपच गंभीर संकट आले. त्यांच्या वडिलांना तोंडाचा कॅन्सर झाला. वडिलांच्या आजारपणामुळे त्यांच्यावर तब्बल 47 लाखांचं कर्ज झालं. ते म्हणतात, 'माझे वडील शेतकरी होते. वडिलांच्या उपचारांसाठी कर्ज काढलं, शेती विकली. एक मुलगा आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी जे काही करू शकतो, ते सर्व केलं. हॉस्पिटलमध्ये माझ्या वडिलांच्या उपचारादरम्यान मला 6 दिवस शवागाराच्या बाहेर झोपावं लागलं. मला माहीत नव्हतं, की ते शवागार आहे. एके दिवशी माझ्यासमोरून एक मृतदेह बाहेर नेण्यात आला, तेव्हा मला समजलं, की ते एक शवागार आहे. वडील आजारपणातून बरे होऊन हॉस्पिटलमधून घरी आले; पण एक वर्षानंतर वडिलांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : ‘या’ 5 ई-बाईक भारतात करणार धूम! किंमतही बजेटमध्ये, पाहा लिस्ट
'वडिलांच्या मृत्यूनंतर एकच शेत आमच्या कुटुंबाकडे उरलं होतं. एके दिवशी शेतातल्या विहिरीजवळ जाऊन मी जीव देण्याचा विचार करत होतो; पण माझ्या डोक्यात विचार आला, की मला आई, भाऊ, पत्नी आहे. त्या सर्वांचा विचार करून मी कामाला लागलो. लहान भावाने मला यू-ट्यूबबद्दल सांगितलं. यानंतर मी हॉंटेड व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली व तसे व्हिडिओ बनवण्याचं काम सुरू केलं. पैसे कमावण्यासाठी मी आता अशा ठिकाणी जाऊन व्हिडिओ बनवतो, जिथे रात्रीचं जाण्यास अनेकांना भीती वाटते,' असं रविकुमार यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Live video viral, Viral, Viral news, Viral photo