जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 21 वर्षीय तरुणाने काढला असा Selfie; पाहून पोलीसही हादरले, ताबडतोब केली अटक

21 वर्षीय तरुणाने काढला असा Selfie; पाहून पोलीसही हादरले, ताबडतोब केली अटक

तरुणाला सेल्फी पडला महागात.

तरुणाला सेल्फी पडला महागात.

तरुणाने सेल्फी घेऊन सोशल मीडियावर पोस्ट केला. पण हा सेल्फी त्याला चांगलाच महागात पडला आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

लंडन, 29 सप्टेंबर : सेल्फी म्हणजे आता सर्वसामान्य झालं आहे. सेल्फी घ्यायला काही कारण किंवा निमित्त लागत नाही. कित्येक लोक आपले सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करतात. सोशल मीडिया उघडलं की असंख्य सेल्फी दिसतील. पण असाच सेल्फी घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. त्याचा सेल्फी पाहून पोलीसही हादरले. त्यांनी त्या तरुणाला लगेच अटक केली. आता असं या सेल्फीत होतं तरी काय? या तरुणाने नेमका असा सेल्फी काय घेतला? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. एडम लॉकवूड असं या तरुणाचं नाव आहे.  21 वर्षांच्या एडमने लंडनमधील एका बिल्डिंगमध्ये जाऊन आपला सेल्फी घेतला. त्याने तो सोशल मीडियावर पोस्ट केला. पण सेल्फी काढून बिल्डिंगच्या खाली येताच त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आता सेल्फी घेणं हा एडमचा गुन्हा आहे का? तर नाही. त्याने जिथं आणि ज्या पद्धतीने सेल्फी घेतला ते खतरनाक आहे. एडमने चक्क एका उंच इमारतीलवर सेल्फी घेतला. ब्रिटनमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेली इमारत द शार्ड.  72 मजल्यांची ही इमारत लंडन ब्रीज स्टेशनजवळ ही बिल्डिंग आहे. या इमारतीत हॉटेल, फ्लॅट आणि ऑफिस आहेत. याच इमारतीवर एडमने आपला सेल्फी क्लिक केला. आता उंच इमारतीवर सेल्फी घेण्यात काय गैर आहे, असंही तुम्ही म्हणाल. पण एडमचा हा सेल्फी फोटो आधी पाहा. जो त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हे वाचा -  साधूच्या सांगण्यावरून स्वतःला 6 फूट जमिनीखाली गाडलं, पोलीसांनी येऊन पाहिलं तेव्हा… Video Viral तुम्ही नीट पाहिलं तर एडमच्या पायात चपला दिसत नाही आहेत. तो चपला न घालता या उंच इमारतीवर चढला आणि इमारतीच्या टॉपवरून त्याने आपला सेल्फी क्लिक केला. सेल्फी पाहूनच आपल्यालाही चक्क येते. तुम्ही पाहाल तर या तरुणाने कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी घेतलेली नाही. त्याने सेफ्टी डिव्हाइस लावलेलं नाही. त्यामुळेच त्याला अटक करण्यात आली आहे. जसा तो इमारतीवरून खाली आला तसं पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

याच इमारतीच्या 40 व्या फ्लोअरवरील एका रूममध्ये एक कपल होतं. पॉल कर्फी नावाची व्यक्ती आपल्या पार्टनरसह होता. या दोघांनी एडमला या इमारतीवर चढताना पाहिलं. एडमनेही त्यांच्याकडे पाहून हात हलवत इशारा केला. कर्फीने सांगितलं, तो आपल्या पार्टनरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता. दोघंही बेडवर होते, तेव्हा अचानक त्यांना एक तरुण दिसला. हे वाचा‘या’ तरुणापासून सावधान! स्वतःला म्हणतो इंजिनीअर, इमोशनल स्टोरी सांगून जाळ्यात ओढतो आणि… लॉकवूडने याआधीही अशा कित्येक उंच इमारतीवर चढण्याचं धाडस केलं आहे.  दुबईत 1280 फूट उंच क्रेनवर चढला होता, मिलानमध्ये 262 उंच सॅन सिरो स्टेडिअमवर गेला होता. क्रोशिआतील  1115 फूट उंच पॉवर स्टेशनवरही तो पोहोचला होता. तिथं त्याने पुलअप्सही केले. आपल्याला उंचावरून पाहायला खूप आवडतं. असे चॅलेंज आवडतात, असं करणंच मला जिवंत ठेवतं, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात