मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'या' तरुणापासून सावधान! स्वतःला म्हणतो इंजिनीअर, इमोशनल स्टोरी सांगून जाळ्यात ओढतो आणि...

'या' तरुणापासून सावधान! स्वतःला म्हणतो इंजिनीअर, इमोशनल स्टोरी सांगून जाळ्यात ओढतो आणि...

ऑनलाइन डेटिंग करून या तरुणाने बऱ्याच महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत धक्कादायक काम केलं आहे.

ऑनलाइन डेटिंग करून या तरुणाने बऱ्याच महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत धक्कादायक काम केलं आहे.

ऑनलाइन डेटिंग करून या तरुणाने बऱ्याच महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत धक्कादायक काम केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

साओ पाओला, 26 सप्टेंबर : सध्या सोशल मीडिया किंवा ऑनलाइन डेटिंग अॅप्स किंवा वेबसाईट्सवरच आयुष्याचा जोडीदार शोधला जातो. अशाच डेटिंग अॅप्सवर आपल्यासाठी जोडीदार शोधणारा हा तरुण. जो दिसायला हँडसम आहे. डेटिंग अॅपवर त्याचं प्रोफाइलही चांगलं आहे. त्या प्रत्यक्ष भेटल्यानंतर, त्याच्याशी बोलल्यानंतर आपल्यासाठी हा परफेक्ट लाइफ पार्टनर आहे, असंच बऱ्याच महिलांना वाटलं. पण जसा हा तरुण दिसतो तसा बिलकुल नाही. त्यामुळे या चेहऱ्याला बिलकुल भुलू नका.

फोटोतील या तरुणाचं नाव रेनन ऑगस्टो गोम्स आहे. तो 36 वर्षांचा आहे. आपण सिव्हिल इंजिनीअर असल्याचं सांगतो. असं सांगून त्याने महिलांना डेट करायला सुरूवात केलं. त्याचं प्रोफाइल पाहून बऱ्याच महिला इम्प्रेस झाल्या. त्याला प्रत्यक्षात भेटल्यानंतर एक चांगला जोडीदार म्हणून त्याच्याकडे पाहत होत्या. त्यानंतर त्याने महिलांसोबत जवळीक वाढवली. त्यांना आपली दुःखद कहाणी सांगितली आणि इथंच या महिला या तरुणाला फसल्या.

हे वाचा - ऑनलाईन ओळख, सोबत घालवली एक रात्र; पहिल्या भेटीतच तरुणीने तरुणाला केलं 'उद्ध्वस्त'

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार रेनने एक नाही तर बऱ्याच डेटिंग अॅप्सवर प्रोफाईल आहेत. तो आपण सिव्हील इंजिनीअर असल्याचं सांगतो. आपण रिलेशनशिपबाबत गंभीर, प्रेमळ आणि चांगला माणूस असल्याचं तो सांगतो. आपले आईवडिल जर्मन होते आणि कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला, असं तो सांगतो.

आपलं रडगाणं सांगून भावुक करून त्यांना त्याने लुटलं. घरबसल्या त्याने महिलांचे तब्बल लाखो रुपये लुटले आहेत. अशा एक-दोन नव्हे तर सात महिलांची त्याने फसवणूक केली आहे. आपण अनाथ असल्याची इमोशनल स्टोरी तो सांगतो आणि महिलांची फसवणूक करतो.  त्याने ज्या महिलांना फसवलं त्यांचं वय 34 ते 40 वर्षांदरम्यान आहे. द सनच्या रिपोर्टनुसार तो महिलांच्या कुटुंबालाही भेटला. गरज म्हणून पैसे मागायचा आणि गायब व्हायचा.

हे वाचा - 'महिन्याला 2 लाख सॅलरी देतो पण अशीच GF हवी', पठ्ठ्यांनी गर्लफ्रेंडसाठी चक्क जाहिरात दिली

7 महिलांना लुटल्याचा आरोप त्याच्यावर आहे. एका महिलेकडून तर त्याने ३२ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे उकळले होते.  गेल्या वर्षभरापासून त्याचा शोध सुरू होता. अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडल्या. पोलिसांनी त्याला साओ पाओलाहून अटक केली. त्याने पोलिसांपासून वाचवण्याच्या प्रयत्ना 3 गाड्यांचा अपघातही केला.

First published:

Tags: Viral