नवी दिल्ली 27 डिसेंबर : आयपीएस अधिकारी सुकिर्ती मिश्रा यांची मैं खाकी हूँ (Main Khaki Hoon) ही कविता (Poem Saluting Police Force) पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे. अवनिश शरन यांनी ही कविता नुकतीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली. आतापर्यंत या कवितेला 5 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. मुंबई शहर पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सुकिर्ती मिश्रा यांची कविता म्हटल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतं. मिश्रा हे उत्तर प्रदेशच्या शामली य़ेथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मिश्रा यांनीही हे ट्विट रिट्विट करत अवनिश शरन यांचे आभार मानले आहेत. माझ्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली म्हणून मीरठमधील जिल्हा प्रशिक्षणानंतर ही कविता लिहिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
घनदाट काळोखात लोकवस्तीत शिरला बिबट्या; तिघांना केलं रक्तबंबाळ,धडकी भरवणारा VIDEO
खाकी घालून देशासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही कविता लिहिण्यात आलेली आहे. ऊन, वारा पाऊस, सण आणि देशावर आलेल्या प्रत्येक संकटादरम्यान ठाम उभा राहणाऱ्या आणि देशासाठीच्या कामाबद्दलचा उल्लेख यातून करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या कवितेला भरपूर पसंती मिळत असून नेटकऱ्यांचं याचं भरपूर कौतुक केलं आहे.
जब भी पढ़ता या सुनता हूँ, दिल रोमांच से भर जाता है.❤️@SukirtiMadhav pic.twitter.com/kktQykJiYT
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) December 25, 2021
मागील वर्षी पंतप्रधान मोदींसोबतच्या ऑनलाईन संवादादरम्यान आयपीएस अधिकाऱ्याने ही कविता सादर केली होती. त्यावेळी ही कविता चांगलीच चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा ही कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.