लखनऊ, 26 डिसेंबर: सध्या सोशल मीडियात बिबट्याचा एक व्हिडीओ वेगानं व्हायरल (Leopard viral video) होतं आहे. ज्यामध्ये हा बिबट्या एका दाट मानवी वस्तीत शिरला (leopard enters in populated area) आहे. काळोखाचा फायदा घेत अन्नाच्या शोधात आलेल्या बिबट्याने परिसरातील तीन लोकांवर प्राणघातक हल्ला केला (3 people injured after leopard attack) आहे. ज्यामध्ये एका वनविभागाच्या कर्मचाऱ्यासह मायलेकाचा समावेश आहे. बिबट्याने तिघांनाही रक्तबंबाळ केलं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असं अचानक बिबट्या मानवी वस्तीत शिरल्याने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री लखनऊ येथील दाट लोकसंख्या असणाऱ्या पहाडपूर आणि कल्याणपूर परिसरात बिबट्या घुसला आहे. बिबट्या लोकवस्तीत घुसल्याची माहिती मिळताच वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. पण वन विभागाच्या सदस्यासह तीन जणांना बिबट्यानं जखमी केलं. संबंधित परिसरात बिबट्या शिरून तब्बल 24 तास उलटून गेले आहेत. तरीही अद्याप बिबट्या जेरबंद न झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हेही वाचा- गेट बंद असूनही बिबट्याने साधला डाव, घरात घुसून कुत्र्याला पळवलं; पाहा LIVE VIDEO लखनऊच्या गुडंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतीला दाट लोकवस्ती असलेल्या पहाडपूर आणि कल्याणपूरमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबट्या दिसला आहे. या बिबट्याने कधी रस्त्यावर तर कधी कुणाच्या घराच्या गच्चीवर धुमाकूळ घातला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाचे पथक सायंकाळी घटनास्थळी पोहोचलं. सापळा रचून बिबट्याला पकडण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले, मात्र तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या तिथून निसटला. सध्या पोलीस आणि वनविभागाचे पथक परिसरात गस्त घालत आहेत.
#Leopard spotted today in Paharpur, Adilnagar, Kalyanpur of Gudumba police limits in #Lucknow pic.twitter.com/WfCFD3WCA9
— Arvind Chauhan 💮🛡️ (@Arv_Ind_Chauhan) December 25, 2021
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याने सर्वप्रथम विनिता रावत नावाच्या महिलेवर हल्ला केला. यावेळी महिलेच्या मुलाने बिबट्यावर विटेनं हल्ला केला असता बिबट्याने त्यालाही जखमी केलं आहे. दरम्यान, या दोघांना वाचवण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यावर देखील बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात तिघंही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.