Home /News /viral /

काय हे प्रेम! एकमेकींना कडकडून मिठी मारताना दिसल्या 2 मांजरी; पाहा Cute Video

काय हे प्रेम! एकमेकींना कडकडून मिठी मारताना दिसल्या 2 मांजरी; पाहा Cute Video

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पफिन आणि बिनक्स (Puffin and Binx) नावाच्या दोन अत्यंत प्रेमळ मांजरी पाहायला मिळतात.

  नवी दिल्ली 23 सप्टेंबर : तुम्ही माणसांना अनेकदा एकमेकांची गळाभेट घेताना पाहिलं असेल. मात्र, तुम्ही कधी प्राण्यांना गळाभेट घेताला पाहिलं आहे का? कदाचित याचं उत्तर नाहीच असेल. मात्र, सोशल मीडियावर (Social Media) सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Cat) होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, की माणसांप्रमाणेच प्राण्यांच्याही भावना असतात. हे प्राणीदेखील एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पफिन आणि बिनक्स (Puffin and Binx) नावाच्या दोन अत्यंत प्रेमळ मांजरी पाहायला मिळतात. मुलावर भिंत कोसळताना दिसताच ढाल बनून उभा राहिली आई; हृदय पिळवटून टाकणारा VIDEO हा सुपर क्यूट व्हिडिओ (Cute Video of Pet Animals) वारंवार पाहावा वाटेल. व्हिडिओ puffin_loves_binx नावाच्या अधिकृत अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. प्रोफाईलच्या बायोमध्ये वाचायला मिळतं, की बिनक्सला रेस्क्यू केलं गेलं होतं. आता ती पफिनची सोलमेट आहे. हे दोघंही एकमेकांपासून कधीच दूर राहात नाहीत.
  View this post on Instagram

  A post shared by @puffin_loves_binx

  व्हिडिओ शेअर करत अॅडमिननं लिहिलं, की गालाला गाल लावून...मला घरी येणं आणि या दोघांना एकमेकांना मिठी मारताना पाहाणं खूप आवडतं. हे सर्वात चांगलं मूड बूस्टर आहे. या व्हिडिओसोबतच कॅप्शनलाही नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळत आहे. नवरीला पाहताच मंडपातच ढसाढसा रडू लागला नवरदेव; VIDEO पाहून नेटकरीही भावुक पोस्ट केल्यापासून यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, की ओह! खूप सुंदर....माझ्याकडेही अशा दोन मांजरी होत्या. मला त्यांची आजही आठवण येते. दुसऱ्या यूजरनं लिहिलं, की असे सुंदर व्हिडिओ खूपच कमी पाहायला मिळतात. तिसऱ्या यूजरनं म्हटलं, की हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी धन्यवाद. तुम्ही माझा दिवसच खूप चांगला बनवला. याशिवाय अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Cat, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या