नवी दिल्ली 23 सप्टेंबर : मागील काही दिवसांपासून लग्नातील नवनवीन व्हि़डिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल (Viral Wedding Video) होताना दिसतात. यातील काही व्हिडिओ खळखळून हसवणारे असतात तर काही व्हिडिओ इमोशनल करणारे असतात. सध्या असाच एक भावुक करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे. यात दिसतं, की एक नवरदेव स्टेजवर उभा आहे. इतक्यात नवरी एन्ट्री (Bride Entry) करते. ती पुढे येऊ लागताच नवरदेव (Groom) अचानक रडू लागतो.
नवरीचं वागणं पाहून सासऱ्याला हृदविकाराचा झटका; तरीही सुरू राहिलं लग्न
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरदेव स्टेजवर उभा आहे. इतक्यात नवरीबाई वरमाळेच्या कार्यक्रमासाठी मंडपात प्रवेश करते. नवरीला पाहून आधी नवरदेवाच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. मात्र, काही वेळात तो इमोशनल होतो आणि ढसाढसा रडू लागतो. त्याला पाहून लग्नात आलेले पाहुणेही इमोशनल होतात.
View this post on Instagram
लस घ्यायला इतके नखरे! वैतागलेल्या मित्रांनी जमिनीवरच आपटलं आणि...VIDEO VIRAL
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ रिचा वर्मा नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, मी त्याला रडू नको असं सांगितलं. पण हा तर सिनेमा पाहूनही रडू लागतो. लग्नात तर हा रडणारच होता आणि मग त्याला पाहून मीदेखील रडू लागले. इतकंच नाही तर पाहुणेही भावुक झाले. असं वाटलं की माझं स्वप्न पूर्ण झालं आणि मी हे आनंदाचे अश्रू आवरू शकले नाही. या कॅप्शनसोबतच #10yearsoftogetherness लिहिलं गेलं आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.