मुंबई, 24 ऑगस्ट : सोशल मीडियावर बऱ्याच लव्ह स्टोरी व्हायरल होत असतात. काही कपल एकमेकांना शाळेपासून ओळखत असतं, काहींचं प्रेम कॉलेजमध्ये सुरू होतं. काही जण एकाच ठिकाणी नोकरी करताना एकमेकांच्या प्रेमात पडतात. तर काही जण तर एकमेकांसाठी अगदी अनोळखी असतात पण एका क्षणात ते प्रेमात पडतात. अशाच एका कपलची बसवाली लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. जादू की डुलकीने दोन अनोळख्या व्यक्तींना एकत्र आणलं आहे. एडी हुआरकाया आणि कॅटालिना जे एकमेकांशी अनोळखी. पण आज ते गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आहेत. बसमध्ये असं काही घडलं की ते दोघं एकमेकांच्या खूप जवळ आलं. या कपलने आपली लव्ह स्टोरी स्वतःच सोशल मीडियावर शेअर केली आहे. 5 जुलैला एडी, कॅटालिना एका बसमधून एकत्र प्रवास करत होते. एडी बराच वेळ कॅटालिनाकडे पाहत होता. जशी तिच्या जवळची सीट रिकामी झाली तसा तो लगेच तिथं जाऊन बसला. दोघंही एकमेकांना ओळखत नव्हते. त्यामुळे दोघंही शांत होते. एकमेकांशी बोलत नव्हते. थोड्या वेळाने कॅटालिनाला डुलकी लागली. झोपेत तिचं डोकं एडीच्या खांद्यावर गेलं. कॅटालिनाला इतकं शांत झोपलेलं पाहून एडीनेही तिला उठवलं नाही किंवा आपल्या खांद्यावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला नाही. किंबहुना तो तिला जाग येऊ नये म्हणून तसाच न हलता बसून राहिला. याचवेळी त्याने लपूनछपून आपल्या मोबाईलमध्ये तिच्यासोबत एक सेल्फीही घेतला. ही त्यांची पहिली भेट. हे वाचा - डेंजरस इश्क! परीक्षेत फेल झाली Girlfriend; Boyfriend ने रागात उचललं धक्कादायक पाऊल एडी आणि कॅटालिना दुसऱ्यांदा पुन्हा समोर आले. तेव्हा एडीने तिला तो फोटो दाखवला आणि त्या प्रवासाची आठवण करून दिली. कॅटालिना तो फोटो पाहून हैराण झाली. आपल्याला हा प्रवास अविस्मरणीय बनवायचा आहे असं एडी तिला म्हणाला. त्यानंतर दोघं एकमेकांशी बोलू लागले. दोघांनीही एकमेकांसोबत फोन नंबर शेअर केला आणि चॅटिंग सुरू झाली. हळूहळू भेटीगाठी वाढल्या. दररोज बोलणं, भेटणं होऊ लागलं. एक दिवस एडीने कॅटालिनाला प्रपोज केलं. कॅटालिनानेही त्याला लगेच होकार दिला. आता दोघंही आपलं नातं पुढे नेण्याचा विचार करत आहेत. एका महिन्यातच ते दोघं एकमेकांच्या इतके जवळ आले. हे वाचा - पायाच्या नखामुळे गर्लफ्रेंडसमोर आलं बॉयफ्रेंडचं सत्य, संपूर्ण किस्सा जाणून बसेल धक्का एडीने टिकटॉक अकाऊंटवर कॅटालिनासोबत भेटीचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. एडी म्हणतो कॅटालिना आता आपली गर्लफ्रेंड आहे. मी खूप आनंदी आहे. कारण ती जगातील सर्वात सुंदर तरुणी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.