मुंबई, 23 ऑगस्ट : सोशल मीडियावर एक अशी बातमी समोर आली आहे, जी ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे. ही बातमी Tiktok Star Abs ने स्वत: शेअर केली आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत झालेल्या फसवणुकीची पोलखोल कशी झाली, याबद्दल तिने माहिती सांगितली आहे. या महिलनं सांगितलं की, तिच्या पायाच्या नखावरुन तिचा बॉयफ्रेंड तिला धोका देत असल्याचे उघड झालं. ही संपूर्ण घटना ऍब्सने टिकटॉकवर सांगितली. ती तिच्या जोडीदाराला भेटायला जात असताना तिने पायाची नखं कापण्याचा निर्णय घेतला. ऍब्सने पुढे सांगितले की तिने एका दुकानातून काही बनावट नखं विकत घेतली, तिने आपल्या पायांची नखं कापल्यावर तिने ही बनावट नखं आपल्या पायांच्या बोटांवर लावली. त्यानंतर ती तिच्या बॉयफ्रेंडच्या घरी गेली. रात्री झोपेत जेव्हा ऍब्स लघवीसाठी उठली तेव्हा तिला आपल्या पायाचं एक नख नसल्याचं जाणवलं. हे वाचा : मुलाला उचलून घेत घरोघरी करतोय फूड डिलिव्हरी, Zomato ‘डिलिव्हरी बाबा’चा व्हिडीओ व्हायरल नंतर ऍब्स बेडवर आली आणि आपलं नख शोधू लागली. तेव्हाला एक नख दिसला जो तिने आपल्या पायाच्या बोटाला लावला आणि मग पुन्हा झोपायला गेली, तेव्हा तिच्या लक्षात आले की तिने नवीन लावलेल्या या नखाचा रंग वेगळा आहे. ऍब्सला लक्षात आले की हा वेगळ्या रंगाचा नख माझा नाही, त्यामुळे नक्कीच येथे दुसरी कोणती मुलगी येत असावी. हे वाचा : तरुणाने एकाच वेळी 8 बायकांशी थाटला संसार, ‘या’ विचित्र प्रेम कहाणीचं गूढ अखेर समोर खरंतर ऍब्सने पांढऱ्या रंगाची नखं लावली होती, परंतु तिने पायाला लावलेले हे नख जांभळ्या रंगाचे होते. त्यानंतर ऍब्सला संपूर्ण प्रकार उघड झाला आणि आपल्या बॉयफ्रेंड आपली फसवणूक करत असल्याचे ऍब्सला कळून चुकलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.