Home /News /videsh /

काय आहे CPR उपचार पद्धत? ज्यामुळे पल्स बंद झाल्यानंतरही फुटबॉलपटू राहिला जिवंत

काय आहे CPR उपचार पद्धत? ज्यामुळे पल्स बंद झाल्यानंतरही फुटबॉलपटू राहिला जिवंत

डेन्मार्कचा फुटबॉलपटू ख्रिश्चियन एरिक्सन (Christian Eriksen) मैदानातच कोसळला. कुणालाही काही कळण्याच्या आतच एरिक्सन बेशुद्ध झाला. त्यातच त्याचा प्लस रेटही बंद (No Pulse) झाला होता.

  मुंबई, 13 जून: युरो कप फुटबॉल (Euro 2020) स्पर्धेत शनिवारची रात्र ही धक्कादायक होती. डेन्मार्कचा फुटबॉलपटू ख्रिश्चियन एरिक्सन (Christian Eriksen) मैदानातच कोसळला. कुणालाही काही कळण्याच्या आतच एरिक्सन बेशुद्ध झाला. त्यातच त्याचा प्लस रेटही बंद (No Pulse) झाला होता. यानंतरही एरिक्सन आज आपल्यात आहे. याचे कारण म्हणजे त्याच्यावर अगदी वेळेवर सीपीआर (CPR) पद्धतीनं उपचार झाले. ख्रिश्चियन मैदानात पडल्यानंतर लगेच डेन्मार्क टीमच्या डॉक्टरांना बोलवण्यात आले. डेन्मार्क टीमच्या डॉक्टर मार्टीन बोसेन (Martin Boesen) यांनी मॅच संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना तो भीतीदायक अनुभव सांगितला. "मी त्याला सर्वप्रथम पाहिले तेव्हा त्याचा श्वास सुरू होता. मी त्याचे पल्स चेक केले,पण त्यानंतर काही क्षणातच परिस्थिती बदलली आणि आम्ही त्याला सीपीआर (CPR) देण्याचा निर्णय घेतला. ख्रिश्चियनला सर्व मदत अत्यंत वेगाने मिळाली. मेडिकल टीम आणि अन्य स्टाफच्या मदतीनं आपण ख्रिश्चियनला वाचवू शकलो." असे डॉक्टरांनी सांगितले. काय आहे सीपीआर उपचार पद्धत? कार्डिओ पल्मोनरी रीससिटेशन (Cardiopulmonary resuscitation) याचं संक्षिप्त रुप म्हणजे सीपीआर (CPR) होय. एखाद्या आपत्कालीन स्थितीत व्यक्तीला किंवा प्राण्याला जिवंत ठेवण्यासाठी वापरली जाणारी उपचार पद्धती आहे. जेव्हा एखादी व्यक्ती श्वास घेणं थांबवते तेव्हा ती बेशुद्ध पडते. अशावेळी त्या व्यक्तीची छाती दाबली जाते. ज्यामुळे शरीरातील रक्तात आधीपासून उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा त्याच्या पूर्ण शरीराला केला जातो. यामुळे व्यक्तीला काही काळ जिवंत ठेवायला मदत होते. सीपीआर उपचार दोन पद्धतीने करण्यात येतात
  1. मानवी पद्धतीने उपचार
  2. वैद्यकीय उपकरणांच्या साह्याने उपचार" एखाद्या व्यक्तीच्या जीवाला जेव्हा धोका असतो, त्यावेळी त्याच्याकडे अत्यंत कमी वेळ असतो. त्या अणीबाणीच्या परिस्थितीमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या मदतीने उपचार केले जातात.  जर त्या व्यक्तीच्या जीवाला फार धोका नसेल तर माननी पद्धतीने सीपीआर उपचार दिले जातात.
  सीपीआर कधी देण्यात येतो? एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडल्यानंतर त्याचा श्वास घेणे थांबते. त्यावेळी ही उपचार पद्धती उपयोगाची ठरते. त्याचबरोबर एखादी व्यक्तीला अचानक विजेचा धक्का बसल्यावर, अपघातामध्ये गंभीर दुखापत होऊन बेशुद्ध झाल्यावर, पोहताना कुणी बुडालं तर त्याच्या फुफ्फुसामध्ये गेलेले पाणी काढण्यासाठी, फुप्फुसामध्ये खूप धूर जमा झाल्यानं ती व्यक्ती बेशुद्ध पडली अथवा त्याला श्वास घेण्यास त्रास झाला तर सीपीआर देण्यात येतो. EURO 2020 मध्ये भयंकर घटना, मॅच सुरू असताना मैदानातच कोसळला खेळाडू, LIVE VIDEO सीपीआर देण्याची पद्धत काय? लहान मुलांसाठी आणि मोठ्या व्यक्तींसाठी सीपीआर उपचाराची पद्धत ही वेगळी आहे. मुल अगदी लहान असेल तर त्याला दोन बोटांच्या किंवा तोंडाच्या साह्याने हळू-हळू श्वास दिला जातो. यामुळे ते मुल लवकर शुद्धीवर येण्यास मदत होते. प्रौढ व्यक्तीला सीपीआर देण्याची पद्धत ही वेगळी आहे.  प्रौढ व्यक्तींना हे उपचार करण्यापूर्वी त्यांना समतल जमिनीवर झोपवले जाते. त्यानंतर त्याची छाती दाबली जाते. तसेच त्याचे डोके खाली राहील या पद्धतीने त्याची छाती जमिनीपासून वर उचलण्यात येते. त्यामुळे देखील त्याच्या  शरीरातील रक्तात आधीपासून उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा मिळतो. EURO 2020: मैदानात कोसळलेल्या एरिक्सनसाठी कॅप्टन ठरला देवदूत! सीपीआर देताना घेण्याची खबरदारी कोणताही व्यक्ती बेशुद्ध पडला तर त्याला सीपीआर दिला जातो असे नाही. सीपीआर देण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक असते. सीपीआर देण्यापूर्वी त्या व्यक्तीला श्वास घेता येईल या ठिकाणी झोपवले पाहिजे. तसेच त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटे सोडू नये. सीपीआर देणाऱ्या व्यक्तीला यामध्ये तज्ज्ञ असेल तरच हे उपचार द्यावेत, अन्यथा हे धोकादायक ठरु शकते. त्याचबरोबर सीपीआरचा उपयोग हा ती व्यक्ती काही काळ जीवंत राहण्यासाठी आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला लवकरात लवकर पुढील उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आवश्यक आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Euro 2021, Sports

  पुढील बातम्या