जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मुलाखत देताना अभिनेते दाढी का खाजवतात? सुनील ग्रोवरनं सांगितलं थक्क करणारं कारण

मुलाखत देताना अभिनेते दाढी का खाजवतात? सुनील ग्रोवरनं सांगितलं थक्क करणारं कारण

मुलाखत देताना अभिनेते दाढी का खाजवतात? सुनील ग्रोवरनं सांगितलं थक्क करणारं कारण

सुनील ग्रोवर देखील मुलाखत देताना आपली दाढी खाजवतो; सांगितलं त्या मागचं थक्क करणार विज्ञान

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 13 जून**:** सुनिल ग्रोवर (Sunil Grover) हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. द कपिल शर्मा शोमधून घराघरात पोहोचलेला सुनील आज केवळ स्टँडअप कॉमेडियनच नाही तर एक अष्टपैलू अभिनेता म्हणून देखील चर्चेत असतो. (bollywood actors) सुनील आपल्या निरिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. तो सतत आपल्या सभोवतालच्या लोकांचं निरिक्षण करत असतो. व त्यांच्या हालचाली, सवयी, बोलण्याची शैली या गोष्टींना टिपून त्याच्यावर आधारित विनोदी व्यक्तिरेखा तयार करण्याचा प्रयत्न करतो. असंच एक थक्क करणारं निरिक्षण त्यानं केलं आहे. अनेक नामांकित अभिनेते मुलाखती देताना आपली दाढी किंवा गाल खाजवताना दिसतात. पण असं ते का करतात? असा प्रश्न त्याला अनेकदा पडला अन् याचं थक्क करणारं उत्तर त्यानं शोधून काढलं आहे. सुनीलची सनफ्लॉवर ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. या सीरिजमध्ये त्यानं केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती केली जात आहे. या सीरिजच्या निमित्तानं मेन्स एक्सपीला दिलेल्या मुलाखतीत त्यानं अभिनेत्याचं मुलाखतीदरम्यान दाढी खाजवण्याचं कारण सांगितलं. ‘बघावं तेव्हा ही बाई गरोदरच असते’; नव्या फोटोशूटमुळं लिसा हेडन होतेय ट्रोल

‘तू चूकीच्या माणसाशी पंगा घेतलास’; अभिनेत्याची सलमान खानला धमकी तो म्हणाला, “एखाद्या अभिनेत्याला कठीण प्रश्न विचारला की तो सुरवातीला तो थोडा गोंधळतो. तो उत्तर देण्यासाठी आपल्या डोक्यात संदर्भांची शोधाशोध सुरु करतो. शब्दांची जुळवाजुळव सुरु करतो. मात्र ही स्थिती मुलाखतदाराला किंवा प्रेक्षकांना कळू नये म्हणून तो विविध प्रकारच्या हालचाली करतो. त्यामध्ये प्रामुख्यानं तो दाढी खाजवतो. यामुळं त्याचं लक्ष कदाचित आणखी केंद्रित होतं. मी देखील हे प्रकार करुन पाहिले आहेत. पण मला ते कधी जमलं नाही. उलट काहीतरी विचित्र दिसू लागायचं त्यामुळं ते करणं मी थांबवलं.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात