मराठी बातम्या /बातम्या /Viral /पोलीस दिसताच चिमुकलीनं केलं असं काही की पाहून अधिकाऱ्यानेही केला सलाम; VIDEO जिंकेल तुमचं मन

पोलीस दिसताच चिमुकलीनं केलं असं काही की पाहून अधिकाऱ्यानेही केला सलाम; VIDEO जिंकेल तुमचं मन

हा व्हिडिओ केरळ पोलिसांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक गोंडस मुलगी पोलिसाच्या जवळ जाते आणि पोलीस अधिकाऱ्याला सलाम करते

हा व्हिडिओ केरळ पोलिसांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक गोंडस मुलगी पोलिसाच्या जवळ जाते आणि पोलीस अधिकाऱ्याला सलाम करते

हा व्हिडिओ केरळ पोलिसांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक गोंडस मुलगी पोलिसाच्या जवळ जाते आणि पोलीस अधिकाऱ्याला सलाम करते

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kerala, India

तिरुअनंतपुरम 24 मार्च : पोलीस कर्मचाऱ्याला सॅल्युट करताना एका चिमुरडीचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून खूप प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडिओ केरळ पोलिसांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक गोंडस मुलगी पोलिसाच्या जवळ जाते आणि पोलीस अधिकाऱ्याला सलाम करते.

स्कूल बस चालवतानाच चालकाला आला Heart Attack; 13 वर्षीय मुलाने असा वाचवला सगळ्यांचा जीव..VIDEO

यानंतर चेहऱ्यावर स्मितहास्य देत पोलिसानेही त्या चिमुरडीला पाहून सलाम केला. हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे. चिमुकलीच्या या खास व्हिडिओला नेटकऱ्यांकडून खूप कौतुक आणि प्रेम मिळत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक या लहान मुलीचं भरपूर कौतुक करत आहेत.

व्हिडिओच्या सुरुवातीला पोलीस व्हॅनच्या मागे उभी असलेली एक लहान मुलगी दिसते. ती पोलिसांच्या गाडीभोवती फिरते आणि पोलिसापर्यंत पोहोचते. समोर पोलिसांना पाहताच ती लगेच सॅल्युट करते आणि हे पाहून पोलिसानेही असेच लगेचच सलाम केला. गणवेशात तैनात असलेला पोलीस, कोणाशी तरी बोलताना दिसतो. मात्र चिमुकलीला पाहून तोही वळून चिमुरडीला सलाम करतो. आज तुम्हाला इंटरनेटवर दिसलेला हा सर्वात सुंदर व्हिडिओ असेल.

व्हिडिओ शेअर करताना केरळ पोलिसांनी लिहिलं, "लहान मुलीकडून प्रेमळ सॅल्यूट." इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ चार लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून ६० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. चिमुरडीच्या या कृत्यावर सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत आणि तिने नेटकऱ्यांचंही मन जिंकलं आहे.

चिमुरडीच्या आईने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं की, “माझी मुलगी नेहा कुट्टी आहे. ती पूर्वा कोस्टल पोलीस स्टेशनसमोर सर्कल इन्स्पेक्टर बिजू सरांना सलाम करत आहे. आणखी एका युजरने कमेंट केली की, "पोलिसांत इतके चांगले अधिकारी आहेत, हे खरं आहे." तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं, "आमच्या केरळ पोलिसांना मोठा सलाम."

First published:
top videos

    Tags: Police, Viral video on social media