नवी दिल्ली 24 मार्च : रस्ते अपघात कुठेही आणि केव्हाही होऊ शकतात. अनेकदा लोक म्हणतात, की समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे अपघात होतात, मात्र हे देखील पूर्णपणे खरं नाही. यात कधी स्वतःचीच चूक असते.... तर कधी कोणाचीच चूक नसते, तरीही अपघात होतात. नुकतंच एका घटनेत एका लहान मुलाने मदतीचा हात पुढे केला नसता तर बसचाही अपघात झाला असता! जेव्हा तुम्ही या घटनेचा व्हिडिओ पाहाल, तेव्हा तुम्हाला समजेल की यात बस ड्रायव्हरची अजिबात चूक नव्हती.
@Enezator या ट्विटर अकाउंटवर अनेकदा विचित्र व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच असाच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो पाहून लोकांना धक्का बसला. या व्हिडिओमध्ये शाळेच्या बसमधील दृश्य दिसत आहे. कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित साधनांच्या चालकांचं काम खूप आव्हानात्मक असतं, कारण त्यांच्याकडे अनेक प्रवाशांची जबाबदारी असते. पण अचानक ड्रायव्हरला काही झालं तर!
चिमुकल्याला बसवून बाईक वळवत होती व्यक्ती, समोरुन भरधाव कार आली आणि...
या व्हिडिओमध्येही तेच घडलं. बसमध्ये बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यात दिसतं, की अनेक लहान मुलं बसमध्ये बसलेली असून चालक बस चालवत आहे. अचानक ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका येतो. आता अशी परिस्थिती असते की यात चालकाचा दोषही नाही. तो बेशुद्ध होताच, शेजारी बसलेला एक 13 वर्षांचा मुलगा स्टेअरिंगकडे धावतो आणि स्वतः बस चालवू लागतो.
School bus driver suffers heart attack and 13-year-old gets behind the wheel and saves all children's lives pic.twitter.com/V0hoandvnt
— Great Videos (@Enezator) March 22, 2023
सर्व मुले घाबरतात पण हा मुलगा स्टेअरिंग हातात घेतो, शांत राहतो आणि बसला योग्य दिशेनं नेतो. मग तो स्टेअरिंगवरून हात काढून ड्रायव्हरची छाती दाबू लागतो. बस चालताना दिसत आहे. तेवढ्यात दुसरा मुलगा येतो आणि कसा तरी बस थांबवतो. त्यामुळे इतरही अनेक मुलांचे प्राण वाचले.
या व्हिडिओला 95 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितलं की, अचानक हृदयविकाराच्या घटना वाढत आहेत, मुलाने मदत केली हे चांगलं आहे. आणखी एकाने म्हटलं की, हे मूल हिरो आहे, त्याच्यामुळे लोक वाचले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.