जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चिमुकलीने कारच्या खिडकीतून डोकं बाहेर काढलेलं असतानाच आईने काच लावली अन्..; थरकाप उडवणारा VIDEO

चिमुकलीने कारच्या खिडकीतून डोकं बाहेर काढलेलं असतानाच आईने काच लावली अन्..; थरकाप उडवणारा VIDEO

कारच्या खिडकीत अडकलं डोकं

कारच्या खिडकीत अडकलं डोकं

गाडी उभी असतानाच चिमुकलीने खिडकीतून मान बाहेर काढली होती. आईने याकडे लक्ष दिलं नाही आणि तिने खिडक्या लावून घेतल्या. यामुळे मुलीची मान काचेत अडकली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 22 जुलै : तुम्हीही तुमच्या लहान मुलांना सोबत घेऊन गाडीतून प्रवास करता का? तुमच्यासोबत गाडीमध्ये जर लहान मूल असेल तर नेहमी सावध राहाणं गरजेचं आहे. कारण थोडासाही निष्काळजीपणा केला तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. मुलांसोबत असताना पालकांना त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. कारण थोडीशीही चूक झाली तर मुलाचा जीवही जाऊ शकतो. लहान मुलं चंचल असतात. त्यांना माहीत नसतं, की ते करत असलेलं एखादं काम त्यांचा जीवही घेऊ शकतं. अशा परिस्थितीत मुलांच्या पालकांनी लक्ष देण्याची गरज असते. सध्या हेच दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज का आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की यातील आईचं लक्ष काही काळ मुलीवरून हटलं होतं. या थोड्याशा निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला असता.

जाहिरात

कार वॉशिंग सेंटरमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा व्हिडिओ कैद झाला आहे. यात दिसतं की एक महिला आपल्या मुलीला सोबत घेऊन कार वॉश करण्यासाठी आली होती. तिने गाडी उभी केली आणि गाडीच्या सर्व खिडक्यांच्या काचा लावण्यात सुरुवात केली. मागच्या सीटवर आपली मुलगी बसली आहे हे तिच्या लक्षातही आलं नाही. गाडी उभी असतानाच चिमुकलीने खिडकीतून मान बाहेर काढली होती. आईने याकडे लक्ष दिलं नाही आणि तिने खिडक्या लावून घेतल्या. यामुळे मुलीची मान काचेत अडकली. Viral Video : साप गळ्यात गुंडाळून स्टंट करणं भोवलं; तरुणाची अवस्था पाहून थरकाप उडेल आईने आरामात काचवर केली आणि गाडी थांबवून खाली उतरली. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने ते पाहून आरडाओरड करून महिलेला मुलीबाबत सांगितलं. महिलेनं लगेचच पळत जात खिडकीत अडकलेल्या मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. कारण तिची मान काचेत अडकली होती. मग गाडी सुरू करून लगेचच महिलेनं काच खाली केली. या दरम्यान मुलीच्या मदतीसाठी अनेकजण पुढे आले. लोकांना जागरूक करण्यासाठी या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे. थोडासा निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो हे हा व्हिडिओ पाहून समजू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात