नवी दिल्ली 22 जुलै : समोर एखादा साप दिसला तरी अनेक लोक घाबरतात आणि त्यांना अक्षरशः घामच फुटतो. मात्र अनेक लोक असेही असतात जे सापांना अगदी सहज पकडतात आणि त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवत राहतात. मात्र असं करत असताना अनेक अपघातही झाले आहेत. सोशल मीडियावर बऱ्याचदा असे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये लोकांना सापाशी खेळण्याचे भलतेच परिणाम भोगावे लागले आहेत. असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा समोर आला आहे, ज्यामध्ये विषारी साप गळ्यात गुंडाळून स्टंट करण्याच्या प्रयत्नात एका तरुणासोबत भयानक घडलं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पीडित तरुणाचा जीव वाचला की नाही हे जाणून घेण्यात युजर्स उत्सुक आहेत. सापासोबत स्टंट करणं किती धोकादायक आहे, हे या व्हिडिओवरून समजू शकतं. या व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या गळ्यात विषारी साप गुंडाळून लोकांसमोर स्टंट करत होता. हा साप आकाराने खूप मोठा आणि पाहून खूप विषारी असल्याचं वाटत आहे. हा साप इतका मोठा आहे, की तो गळ्यात गुंडाळण्यासाठी तरुणाला खूप धडपड करावी लागली.
Folks be asking to die… why would you wrap a snake around your neck like that pic.twitter.com/zhAoUHD1mh
— SSJ4 goku 💫🐐 (@Dro2H) July 15, 2023
मात्र इतकं सगळं करूनही या तरुणाला सापाचं संपूर्ण शरीर गळ्यात गुंडाळणं जमलं नाही. या विषारी सापाचा अर्धा भाग तरुणाच्या गळ्याभोवती गुंडाळलेला आहे, तर अर्धा भाग जमिनीवर लटकलेला आहे. यानंतर हा तरुण एका हाताने सापाच्या तोंडाचा भाग पकडून दुसरा हात हवेत फिरवत उपस्थित प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारण्यास सुरुवात करतो. जंगलाच्या राजाच्या हद्दीत घुसली मगर, सिंहाची शिकार पळवण्याचा प्रयत्न; पुढे काय घडलं पाहा VIDEO यानंतर तिथे जे काही घडतं ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. हे सगळं करत असताना तरुणाने खाली बसण्याचा प्रयत्न करताच तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याच्या टीमचे लोक धावत आले आणि त्या सापाला तरुणाच्या शरीरापासून वेगळं केलं. यादरम्यान त्या तरुणाच्या शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल होत नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. सापाला त्याच्या शरीरापासून वेगळं केल्यानंतर त्याच्या टीममधील लोकांनी त्या तरुणाला उचलून घेतलं. मात्र त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल दिसली नाही. यानंतर सर्वांनी मिळून त्या तरुणाला उचलून तिथून दूर नेलं.