Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सोशल मीडियावरचा 1 नंबर ट्रेण्ड झाली ही आईस्क्रीम इडली! तुमचं काय म्हणणं आहे यावर

सोशल मीडियावरचा 1 नंबर ट्रेण्ड झाली ही आईस्क्रीम इडली! तुमचं काय म्हणणं आहे यावर

सध्या सोशल मीडीयावर Viral photo एक फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. तुम्हाला आवडेल का ही खायला? कमेंट करून सांगा

सध्या सोशल मीडीयावर Viral photo एक फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. तुम्हाला आवडेल का ही खायला? कमेंट करून सांगा

सध्या सोशल मीडीयावर Viral photo एक फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. तुम्हाला आवडेल का ही खायला? कमेंट करून सांगा

मुंबई, 1 ऑक्टोबर: whatsapp, facebook, instagram वर असाल तर तुम्ही एव्हाना ती इडली कुल्फी किंवा आइस्क्रीम इडली पाहिली असेलच. कुल्फीच्या काडीला कँडीसारखी लावलेली इडली...  फूड ब्लॉगरच नाही तर आजकाल सर्वांनाच चमचमीत काही तरी नवीन असे पदार्थ खायला आवडतात. त्यात आता भर पडली आहे ती म्हणजे या युनिक तयार करण्यात आलेली इडकुची.

दक्षिणेकडील साऊथच नाही तर आज भारतातही सर्वत्र ठिकाणी इडली, मेदू वडा असे काही दक्षिण भारतीय पदार्थ खायला आवडतात. भारतीयांना तर हे पदार्थ इतके आवडतात की अगदी नाश्त्याला या पदार्थांचा समावेश भारतीयांकडे असतो. पण आता नवीन आइस्क्रीम इडली आहे तरी काय? सध्या या इडलीच्या फोटो Ice-cream Idli Viral photo ने सोशल मीडियावर नुसता धूर केला आहे.

सोशल मीडियावर शेअर होणारी आइस्क्रीम इडली...

सध्या इंटरनेट वर शेअर होणारी ही इडली आइस्क्रीम इडली आहे की, साधी तांदळाची इडली. हे समजणं देखील कठीण जात आहे. पण आम्ही तुम्हाला सांगू तर ही नवीन अशी युनिक इडली ही आपल्या तांदळाच्या पिठापासून तयार करण्यात आलेलीच इडली आहे. फक्त इडली मध्ये नवीन असे की, या इडलीला आइस्क्रीम कँडी चा आकार देण्यात आला आहे. पण सध्या या इडलीच्या रूपानं सर्वांनाच आश्चर्य चकित केलेले आहे.

VIDEO: राणू मंडलने गायलं नवं गाणं, Manike Mange Hite मुळे पुन्हा होतेय ट्रेंड

सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा बेंगळरू येथील हॉटेल मधला आहे. या डिश मध्ये फक्त आपल्या दररोजच्या इडलीला आइस्क्रीम कँडीच्या आकारात सर्व्ह केले असून सोबत चटणी सांभार देण्यात आले आहे. बऱ्याच लोकांनी या creative Idli वर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. शिवाय हा फोटो अपलोड होताच अनेक खवव्यांनी या इडली ला खाण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे.

Ice-cream Idli च्या सोशल मीडियावरील लोकांच्या प्रतिक्रीया...

काँग्रेस पक्षाचे नेते शशी थरूर आणि महिंद्रा उद्योग समूहाचे आनंद महिंद्रा यांनी देखील या इडलीचा फोटो आपल्या ट्विटर अकाउंट वर शेअर केला आहे.

First published:

Tags: Food, Tasty dishes, Viral post