मराठी बातम्या /बातम्या /Viral /Delhi IGI Airport वर पुन्हा घुसला Monkey, फूड प्लाझामध्ये घातला धुमाकूळ; पाहा VIDEO

Delhi IGI Airport वर पुन्हा घुसला Monkey, फूड प्लाझामध्ये घातला धुमाकूळ; पाहा VIDEO

विमानतळावर माकडाने घातला धुडगूस.

विमानतळावर माकडाने घातला धुडगूस.

विमानतळावर माकडाने घातला धुडगूस.

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : माकडांचा (Monkey video) उच्छाद नवीन नाही. अगदी घराजवळही माकड थैमान घालतात. पण आता तर चक्क विमानतळावरही माकड घुसलं आहे. दिल्लीतील (Monkey at Delhi airport) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Delhi Indira Gandhi International Airport) माकड  घुसलं (Monkey at IGI Airport) आणि त्याने जंगी पार्टी केली. हा व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.

आयजीआय एअरपोर्टवरील (IGI Airport) प्रीमिअम लाऊंजमध्ये हे माकड घुसलं. व्हिडीओत पाहू शकता माकड फूड प्लाझाच्या काऊंटवर बसलेलं आहे. तिथं ते वेगवेगळे पदार्थ चाखताना दिसतं आहे. एक ज्युसची बाटली तो खाली पाडतो आणि त्यातील ज्युसचा मस्त आस्वाद घेताना दिसतं. त्यानंतर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उड्या मारताना दिसतं.

" isDesktop="true" id="611853" >

माकडाला विमानतळावर पाहून तिथं उपस्थित नागरिकांना धक्का बसला. सर्वजण त्या माकडाला पाहत राहतात. घाबरून त्याच्यापासून सर्व दूरच राहिले आहेत. भीतीने कुणी त्याला हाकलण्याचा प्रयत्नही करत नाही. पण सर्वांनी माकडाचे हे माकडचाळे आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. माकड थोडा वेळ इथं तिथं उड्या मारतं आणि नंतर स्वतःच तिथून निघून जातं. कदाचित हे माकड भुकेलं होतं आणि खाण्याच्या शोधातच ते विमानतळावर आलं होतं. खाऊन-पिऊन झाल्यानंतर तो तिथून गेला, सुदैवाने त्याला कुणालाही हानी पोहोचवली नाही.

हे वाचा - एका नागिणीसाठी 3 साप घायाळ; जबरदस्त फायटिंगनंतर मादीने...; काय घडलं पाहा VIDEO

या विमानतळावर माकड घुसण्याची ही पहिली वेळ नाही.  याआधी 2018 सालीसुद्धा याच एअरपोर्टवरील माकडाचा असा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याने तर चक्क विमानतळावर पार्टीच केी होती.

" isDesktop="true" id="611853" >

जेना कार्टिस नावाच्या परदेशी पर्यटकाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.  फूड काउंटरजवळ ठेवलेल्या फ्रिजमधून पाणी आणायला जाताना तिला एक प्राणी दिसला. तिने पाणी घेतल्यानंतर वळून पाहिले, तेव्हा तिला माकड दिसलं. ते माकड कशाशीच पर्वा न करता निवांत बसून समोर असलेल्या प्लेटमधील वेगवेगळे पदार्थ खात होतं. तेव्हा जेन्नाने माकडाचा व्हिडीओ काढून तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

हे वाचा - आकर्षक दिसत असला तरी या माशापासून राहा सावध! खायचं सोडा, स्पर्शानेही जाईल जीव

व्हायरल व्हिडिओमध्ये हे माकड (primate) एका काउंटरवर बसून आरामात खाताना दिसत आहे. काही काळानंतर, ते माकड खाणं सोडून दुसर्‍या काउंटरवर उडी मारतं. नंतर एका प्लेटमधून ते आणखी एक मूठभर पदार्थ खायला उचलतं. ते चालायला लागतं आणि बाकीच्या प्लेटमधील पदार्थांचं निरीक्षण करत असतं. तेवढ्यात त्याला केळी (bananas ) दिसतात. ते काळजीपूर्वक त्यातील एक केळं घेत आणि भिंतीवरून उडी घेऊन लाउंजमधून बाहेर पडतं. व्हायरल हॉग युट्यूब चॅनेलवर मे, 2021 रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.

First published:

Tags: Airport, Delhi, Viral, Viral videos, Wild animal