मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कोणी बोनेटवर तर कोणी समोर उभा; सिंहांनी चारचाकीला घेरलं अन्...; धडकी भरवणारा VIDEO

कोणी बोनेटवर तर कोणी समोर उभा; सिंहांनी चारचाकीला घेरलं अन्...; धडकी भरवणारा VIDEO

एका व्हिडिओमध्ये सिंह पाहायला मिळत आहेत, या सिंहांनी गाडीवर कब्जा केला आहे.

एका व्हिडिओमध्ये सिंह पाहायला मिळत आहेत, या सिंहांनी गाडीवर कब्जा केला आहे.

एका व्हिडिओमध्ये सिंह पाहायला मिळत आहेत, या सिंहांनी गाडीवर कब्जा केला आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 21 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे भरपूर व्हिडिओ (Animal Videos) पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ अतिशय प्रेमळ असतात तर काही व्हिडिओ अतिशय भयानक. सध्या इंटरनेटवर एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका व्हिडिओमध्ये सिंह पाहायला मिळत आहेत, या सिंहांनी गाडीवर कब्जा केला आहे. तुम्ही अनेकदा जंगलाच्या राजाला चित्रपटांमध्ये किंवा प्राणीसंग्रहालयात पाहिलं असेल. मात्र, सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Shocking Video of Lion) होत आहे. बापरे! चालकाशिवायच वेगात धावू लागली दुचाकी; VIDEO पाहून नेटकरी शॉक हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. व्हायरल होणारा हा व्हिडिओ IFS ऑफिसरने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की सिंहांनी एका गाडीला घेरलं आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की अचानक हे सिंह बाहेर आले आणि कारला वेढा घातला. एक सिंह कारच्या बोनटवर चढला. दर दुसरा शेजारी येऊन उभा राहिला. व्हिडिओ पाहूनच अंदाज येतो की कारमध्ये बसलेल्यांची अवस्था कशी झाली असेल. हा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसंच, हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्वरही शेअर केला जात आहे. अरे बापरे! झोका देता देता स्वतःही हवेत उडाला तरुण; पाहा VIDEO व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, या कारच्या आतमध्ये जे आहेत त्यांचं हृदय ड्रमप्रमाणे धडधड करत असेल. मी आशा करतो की कारमध्ये बसलेले लोक ठीक असावेत. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, मला कधीही या परिस्थितीत नाही अडकायचं. तिसऱ्या यूजरनं लिहिलं, हे देवा! कारमध्ये बसलेल्या लोकांची काय अवस्था झाली असेल. याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.
First published:

Tags: Shocking video viral, Wild animal

पुढील बातम्या