नवी दिल्ली 21 ऑक्टोबर : सोशल मीडिया (Social Media) हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करताच व्हायरल (Viral Photos and Videos) होतात. यातील काही व्हिडिओ तर असे असतात ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण वाटतं. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सही हैराण झाले आहेत. आपल्या फॉलोअर्सचं मनोरंजन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आनंद महिंद्रा यांनी हा मजेशीर व्हिडिओ (Bike Stunt Video) शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून ते स्वतःही घाबरले आणि यूजर्सही थक्क झाले. ती बातम्या देत होती आणि मागे सुरू होतं अश्लील दृश्य; तो VIDEO पाहून प्रेक्षक शॉक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @DoctorAjayita नावाच्या एका यूजरनं आपल्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती बाईकच्या मागच्या सीटवर बसलेला आहे आणि समोरचं चालकाचं सीट रिकामं आहे. हैराण करणारी बाब म्हणजे ही गाडी अगदी वेगात चाललेली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Elon Musk: I want to bring driverless vehicles to India.
— Dr. Ajayita (@DoctorAjayita) October 19, 2021
Meanwhile India... pic.twitter.com/9YSFg0bYkW
व्हिडिओ शेअर करत ट्विटर यूजरनं कॅप्शनमध्ये लिहिलं, एलॉन मस्कनं म्हटलं, मला भारतात विना चालकच गाड्या चालवायच्या आहेत. दुसरीकडे प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रांबद्दल बोलायचं झालं, तर ते रोज आपल्या ट्विटर अकाऊंवरुन नवनवे व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या काही पोस्ट मजेशीर तर काही प्रेरणादायी असतात. सध्या व्हायरल होणारा हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनीही आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्वा! ‘मेरे सपनो की रानी’ गाणं काय वाजवलंय; मुंबई पोलीस बँडचा जबरदस्त VIDEO हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं, की ‘खूपच आवडला…मुसाफिर हूं यारों… ना चालक है, ना ठिकाना..’. अनेकजण हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत. तर काहींना आनंद महिंद्रा यांनी दिलेलं हे कॅप्शन फार आवडलं आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 5 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक आणि रिट्विटही केला आहे.