इराण 01 फेब्रुवारी : एका प्राणिसंग्रहालयातून अतिशय अजब घटना समोर आली आहे. यात एका सिंहिणीने झू-कीपरवरच हल्ला केला आणि त्याचा जीव घेतला (Zoo Keeper Died in Lioness Attack). यानंतर पकडलं जाण्याच्या आधीच ही सिंहीण आपल्या जोडीदारासोबत इथून फरार झाली (Lioness Escaped from Zoo). यामुळे एकच खळबळ उडाली. ही घटना इराणमधील असून स्थानिक माध्यमांनी या घटनेची सोमवारी माहिती दिली. Shocking! मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटायला निघालेला; अंधारात खोल विहिरीत कोसळला प्राणिसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, “सिंहीण अनेक वर्षांपासून प्राणिसंग्रहालयात होती. पिंजऱ्याचे दार उघडून ती बाहेर गेली आणि त्यानंतर एका 40 वर्षीय रक्षकावर हल्ला केला”. कर्मचाऱ्याने सांगितलं की, प्राणिसंग्रहालयाचा रक्षक या जोडप्यासाठी अन्न घेऊन आला होता. यादरम्यान सिंहिणीने त्याच्यावर हल्ला केला. कर्मचाऱ्याने सांगितलं की तेहरानच्या दक्षिण-पश्चिमेला सुमारे 200 किलोमीटर (125 मैल) अंतरावर असलेल्या मरकाझी प्रांतातील अराक शहरातील प्राणिसंग्रहालयातील दोन प्राणी रविवारी त्यांच्या पिंजऱ्यातून सुटले होते. प्रांताचे गव्हर्नर अमीर हादी यांनी सांगितलं की, घटनेनंतर सुरक्षा दलांनी प्राणी संग्रहालयाचा ताबा घेतला. सिंहीण आणि तिच्या साथीदाराला जिवंत पकडण्याचे प्रयत्न यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं. शिकार करण्यासाठी बिबट्याने घेतली पाण्यात उडी अन्..; VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ अलीकडेच चीनमधील बीजिंग प्राणिसंग्रहालयाचा एक व्हिडिओ समोर आला होता. यात एक मोठा पांडा त्याच्या घेरातून बाहेर आला होता. सहा वर्षांचा मेंग लॅन हा पांडा आपल्या घेराच्या भिंतीवर चढून प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना पाहत होता. तेव्हा तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी लोकांना त्याच्यापासून दूर उभा राहण्याचं आवाहन केलं होतं. अशात आता इराणमधून ही घटना समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.