लखनऊ 01 फेब्रुवारी : प्रेमात माणूस काहीही करू शकतो, असं अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. अशीच एक घटना सध्या उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखनऊमधून समोर आली आहे. या घटनेत मध्यरात्री आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेला युवक खोल विहिरीत कोसळला (Lover Fell in Well at Midnight). तरुण मदतीसाठी ओरडत असल्याने त्याचा आवाज ऐकून आसपास गस्त घालणारे पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी लाकूड आणि दोरीच्या मदतीने या तरुणाला विहिरीतून बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचवला. जागरणाला गेलेल्या विवाहितेसोबत घडलं विपरीत, अर्धनग्नावस्थेत शेतात आढळला मृतदेह ही घटना रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. युवकाला दोरीच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी बरेच तास मेहनत घ्यावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या बिजनौर ठाण्याच्या परिसरातील माटी गावतील एक युवक आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. यादरम्यान रात्री अंधार भरपूर असल्याने त्याला विहीर दिसली नाही आणि हा युवक थेट विहीरीत कोसळला. यानंतर तो जोरजोरात ओरडू लागला. युवकाचा आवाज ऐकताच गस्त घालणारे पोलीस तिथे पोहोचले. ओरडण्याच्या आवाजावरुन पोलिसांनी आसपास शोधाशोध सुरू केली. पोलिसांना दिसलं की एक युवक विहिरीतून ओरडत आहे. पोलिसांनी लगेचच गावकऱ्यांच्या मदतीने दोरी आणि लाकडाची व्यवस्था केली. यानंतर दोरी विहिरीत टाकण्यात आली. बराच वेळ विहिरीत राहिल्याने हा युवक थंडीने कापत होता. दोरीच्या सहाय्याने त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आलं आणि त्याचा जीव वाचला.
बलात्कार करून पळाला पण कबाबच्या मोहामुळे अडकला जाळ्यात; भूकेनं पोहोचवलं गजाआड
लखनऊचे आयुक्त डीके ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण कोणाला तरी भेटण्यासाठी रात्री उशिरा माटी गावात पोहोचला होता. हा युवक बिजनौर परिसरात राहतो. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे तरुणाचे प्राण वाचले. त्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.