नवी दिल्ली, 05 जुलै : तुम्हाला कुणी मारलं, ओरडलं अगदी तुमचे वडीलही त्या जागी असतील तर आई तुमच्यासमोर ढाल बनून उभी राहते. आपल्या मुलांना ती कुणाला मारू, ओरडू देत नाही. तिने स्वतः तसं केलं तरी ती लगेच प्रेमाने जवळ घेते. आईचं हे असं प्रेम फक्त माणसांतच नाही तर प्राण्यां मध्येही पाहायला मिळतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. छाव्यांची शिकार करायला आलेल्या जंगलाच्या राजाला जंगलाच्या राणीने फक्त डरकाळीनेच पळवून लावलं आहे. काही वेळा जंगलातील आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी सिंह आपल्याच छाव्यांची शिकार करतो. अशीच शिकार करायला आलेला हा सिंह. पण सिंहिणीने मात्र तसं होऊ दिलं नाही. सिंह पिल्लांची शिकार करायला येताच, सिंहिण त्याला भिडली. तिच्या डरकाळीनेच सिंहाला घाम फुटला. मग त्याची पिल्लांजवळ जाण्याची हिंमत काय? पिल्लांजवळ जाणं दूरच, त्याने तिथून स्वतःच पळ काढला. VIRAL VIDEO - खेळता खेळता चिमुकल्याने पिटबुलच्या डोक्यात मारली बाटली; पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहूनच भरेल धडकी Maasai Sightings या युट्यूह अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, एक सिंहीण तिच्या पिल्लांसह बसली होती. तेवढ्यात एक सिंह आला आणि त्यांच्या गुहेजवळ बसला. सिंहाने यापूर्वी सिंहिणीच्या एका पिल्लाला मारलं होतं. याचा सिंहिणीला खूप राग आला. तिला भीती वाटत होती की ती गेली तर सिंह तिच्या इतर पिल्लांनाही मारेल. म्हणूनच ती सोडायला तयार नव्हती. सिंहाला मुलांकडे जाताना पाहून सिंहिण रागाने लाल झाली. ती सिंहाच्या दिशेने धावत गेली. सिंह बिच्चारा तिथंच गुपचूप मान खाली घालून उभा राहिला. थोड्या वेळाने पिल्लं खेळत खेळत झुडूपातून बाहेर आली. त्यांना आपल्यासमोर असलेल्या धोक्याबाबत माहिती नव्हतं. पण पिल्लं जिथं जिथं जात होती. सिंहिण त्यांच्यासमोर राहत होती आणि सिंहाला दूर लोटत होती. काही वेळाने एक पिल्लू सिंहाच्या अगदी जवळ गेलं. तशी सिंहिण सिंहावर धावत गेली. यानंतर मात्र सिंह पळून गेला. लोभ खूप वाईट, बिबट्याने केली रानडुकराची शिकार; पण तेव्हाच घडलं असं काही की… यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने आपण सिंहाला असं कधीच पाहिलं नसल्याचं म्हटलं आहे. दुसऱ्या एका युझरने गोंडस शावक पहिल्यांदाच आपल्या पालकांना एकमेकांशी लढताना पाहत आहेत, असं म्हटलं तर आणखी एकाने सिंहाला छाव्याला दुखापत करायची नव्हती पण आधीच्या अनुभवामुळे सिंहिण घाबरली आहे. म्हणून सुरक्षा पहिली.
.तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.